गजानन कीर्तिकर यांचा घुमजाव, आधी म्हणाले, मुलाविरोधात निवडणूक लढेन, नंतर म्हणाले…

गजानन कीर्तिकर यांनी आपण पुत्र अमोल कीर्तिकर विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा अशी थेट राजकीय लढाई बघायला मिळणार अशी चर्चा रंगली. पण त्यानंतर लगेच गजानन कीर्तिकर यांनी आपल्या भूमिकेतून युटर्न घेतला आहे.

गजानन कीर्तिकर यांचा घुमजाव, आधी म्हणाले, मुलाविरोधात निवडणूक लढेन, नंतर म्हणाले...
कीर्तिकर पिता-पुत्र
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 10:03 PM

शिवसेना पक्षात मोठी फूट पडली तेव्ही ही फूट अनेक घरात आणि भावकीपर्यंत जाऊन पोहोचल्याची चर्चा होती. पण हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. याच संघर्षाचं एक उदाहरण सध्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात बघायला मिळत आहे. हा संघर्ष पिता-पुत्रामध्ये आहे. विशेष म्हणजे हा राजकीय संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत. एकीकडे शिवसेना पक्षात कित्येक वर्ष राजकारण करणारे पिता, तर दुसरीकडे जन्मदात्या वडिलांच्या विरोधात निवडणुकीत उभा ठाकलेला मुलगा. हा संघर्ष अटळ आहे. कारण दोन्ही पक्षांकडून आता उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली आहे. अमोल कीर्तिकर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर दुसरीकडे आता याच मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी आपल्या उमेदवारीची घोषणी केली आहे. पण नंतर त्यांनी आपण मुलाच्या विरोधात प्रचार करणार असून उमेदवारी लढवणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात लढणार, अशी घोषणा गजानन कीर्तिकर यांनी केली आहे. या मतदारसंघाचे गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत. पण त्यांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. पण आता स्वत: गजानन कीर्तिकर यांनी आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. “मला विचारलं की, अमोलच्या विरोधात निवडणूक लढणार का? होय, मी लढणार आहे”, असं गजानन कीर्तिकर म्हणाले. पण नंतर त्यांनी आपली प्रतिमा मलिन होईल, असं म्हणत मुलाच्या विरोधात प्रचार करणार असं म्हटलं आहे.

संजय निरुपम यांचा पत्ता कट?

महायुतीकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाकडून यापूर्वी उमेदवरांची घोषणा करण्यात आलेली नव्हती. पण ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांच्या नावाची आधीच घोषणा केलेली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा याआधी केली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विरोध केला होता. त्यांनी या मु्द्द्यावरुन अमोल कीर्तिकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती.

संजय निरुपम यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे त्यांनी आघाडी धर्माचं पालन न केल्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. यानंतर संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. संजय निरुपम या मतदारसंघावर उमेदवारीसाठी प्रचंड इच्छुक आहेत. पण स्वत: गजानन कीर्तिकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने आता पिता-पुत्रात थेट लोकसभेच्या निवडणुकीची लढाई होण्याची शक्यता होता. असं असलं तरी आता अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात महायुतीचे अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.