मोठी बातमी: यंदा सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा; वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली

Ganesh Utsav 2021 | कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तींचे काम मूर्तीकारांनी सुरू केलेले नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी.

मोठी बातमी: यंदा सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा; वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली
गणपती बाप्पा
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 3:16 PM

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021)

तत्पूर्वी राज्यातील मूर्तीकारांनीही महाविकास  महाविकासआघाडी सरकारकडे तातडीने गणेशोत्सवाबाबत (Ganesh Utsav) धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली होती. रेश्मा खातू यांनी यासंदर्भात मूर्तीकारांची बाजू मांडली. गणेशोत्सवाला अवघे दोन महिने उरलेले असताना मूर्तीकार मात्र चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तींचे काम मूर्तीकारांनी सुरू केलेले नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी. जेणेकरून मूर्तिकारांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल. मूर्तीकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा असल्याचे रेश्मा खातू यांनी म्हटले होते.

गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नकोच

यंदाच्या गणेशोत्सवदरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जात आहे.

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

* गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित. * कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. *सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी *विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. * नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी. * शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. *सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत * आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. *नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. * गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

संबंधित बातम्या:

चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल

‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा

Mumbaicha Raja | ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय

(Maharashtra govt guidelines for Ganesh Utsav 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.