Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील पुढे अभिनेत्रीही फिक्या; एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा चक्रावणारा

कार्यक्रमाच्या घेता येईल तेवढ्या सुपाऱ्या कमीच असतात. लोकांची प्रचंड मागणी आणि तारखाच नसल्याने गौतमी पाटीलला आपल्या गावात कार्यक्रमाला आणण्यासाठी सांगेल तितकं मानधन द्यायला लोक तयार असतात.

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील पुढे अभिनेत्रीही फिक्या; एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा चक्रावणारा
Gautami Patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 6:58 AM

मुंबई : घायाळ करणाऱ्या अदा आणि ठुमके, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हातोटी आणि वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत साधेपणाची राहणी यामुळे प्रसिद्ध नृत्यांगणा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. कधी काळी ऑर्केस्ट्रात अदाकारा म्हणून काम करणारी… बॅकस्टेज असलेली गौतमी पाटील आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या तारखा जशा मिळणं मुश्किल आहे, तसंच काहीसं गौतमी पाटीलचं आहे. गौतमी पाटीलच्याही तारखा मिळणं मुश्किल असतं. कारण तिच्या महिन्याच्या सर्व तारखा बुक असतात. कार्यक्रमाच्या घेता येईल तेवढ्या सुपाऱ्या कमीच असतात. लोकांची प्रचंड मागणी आणि तारखाच नसल्याने गौतमी पाटीलला आपल्या गावात कार्यक्रमाला आणण्यासाठी सांगेल तितकं मानधन द्यायला लोक तयार असतात. पण तरीही तारखाच शिल्लक नसतात त्यामुळे गौतमीला अनेक कार्यक्रमांच्या तारखा पुढच्या महिन्याच्या द्यावा लागत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पुणे, कोल्हापुरात सर्वाधिक कार्यक्रम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमी सध्या एका कार्यक्रमाचे दीड ते 2 लाख रुपये मानधन घेते. तिचा दहा बारा जणांचा लवाजमा असतो. या सर्वांमध्ये मानधनाचं वाटप केल्यानंतरही गौतमी महिन्याला 30 ते 35 लाख रुपये सहज कमावते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. गौतमी खानदेशातील असूनही पुणे आणि कोल्हापुरात तिचा चाहता वर्ग अधिक आहे हे विशेष.

अश्लीलतेचा ठपका

दरम्यान, सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची तिच्यावर टीका झाली होती. तिलाही टीकेत तथ्य वाटल्याने तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही आणि थांबताना दिसत नाही.

त्या व्हिडीओमुळे हादरली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ काढून व्हायरल केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गौतमी चांगलीच हादरून गेली. या प्रकरणी तिने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
मास्टरमाईंड मुंडेंच्या जवळचा असल्याने.., फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका.
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'
मुंडे समर्थक राजीनाम्यानंतर नाराज, '...त्याची शिक्षा साहेबांना का?'.
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकी? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा.