तुम्हीच सांगा कसा असा जाहीरनामा, भाजपने लढवला असा फंडा

LokSabha Election 2024 | भारतीय जनता पक्षाने प्रथमच आगामी लोकसभेसाठी वेगळी कल्पना राबवली आहे. जाहीरनाम्यासाठी भाजप जनतेचे मत घेणार आहेत. जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी जनमत घेणार आहे.

तुम्हीच सांगा कसा असा जाहीरनामा, भाजपने लढवला असा फंडा
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:54 AM

मुंबई, नवी दिल्ली | दि. 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका या महिन्यात जाहीर होणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. परंतु भाजपकडून जय्यत तयारी आणि नियोजन केले जात आहेत. भाजपने महाराष्ट्रातील लोकसभांच्या जागांसाठी २३ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तसेच भाजपने जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी यावर्षी प्रथमच वेगळी कल्पना राबवली आहे. जाहीरनाम्यासाठी भाजप जनतेचे मत घेणार आहेत. जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत यासाठी जनमत घेणार आहे. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून जनतेच्या सूचना मागवणार आहेत.

तुम्ही सांगा कोणता मुद्दा असावा जाहीरनाम्यात

निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडत असतो. मात्र यावेळी भाजपने जाहीरनाम्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. १५ मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात , असे आवाहन भाजपकडून करण्यात आलंय.

नमो ॲप, ट्वीटरच्या माध्यमातून देता येणार सूचना

चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले आहे.  नमो ॲप,  ट्वीटर सारख्या  अशा विविध मार्गानेही नागरिक भाजपाला सूचना करू शकतात, असे भाजपकडून सांगण्यात आलेय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ”विकसित भारत – मोदी की गारंटी रथ” (व्हिडीओ व्हॅन ) सर्व लोकसभा मतदारसंघांत फिरणार आहे. त्याद्वारेही सामान्य नागरिकांना आपल्या सूचना भारतीय जनता पार्टीकडे कळविता येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या  व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून २५० ठिकाणी समाजातील वेगवेगळया घटकांशी संवाद साधला जाणार आहे. या संवादातून आलेल्या सूचनांचाही समावेश संकल्प पत्रामध्ये केला जाणार आहे. 15 मार्चपर्यत सूचना पक्ष कार्यालयात पाठवण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. 9090902024 या क्रमांकावरही नागरिकांना जाहीरनामा कसा हवा याच्या सूचना देता येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.