माझ्या आई-वडिलांना शोधा, घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची आर्तहाक

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांचा अजूनही शोध सुरुच आहे. ही घटना किती भयानक होती हे शब्दांमध्ये सांगण आता अवघड होऊन बसलंय. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आई-वडिलांच्या शोधासाठी मुलगा अमेरिकेतून साद घालतोय. अतिशय सुन्न करणारं हे सगळं आहे.

माझ्या आई-वडिलांना शोधा, घाटकोपर घटनेनंतर अमेरिकेतून मुलाची आर्तहाक
मुंबई विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर मनोज चंसोरिया (वय ६० वर्ष) यांचा अजून देखील पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली शोध सुरूच आहे.
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 10:02 PM

मयुरेश जाधव, Tv9 प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 52 तास पेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यानंतर अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. मात्र मुंबई विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर मनोज चंसोरिया (वय ६० वर्ष) यांचा अजून देखील पेट्रोल पंपाच्या ढिगाऱ्याखाली शोध सुरूच आहे. मनोज हे मुंबईच्या विमानतळावर एअर ट्राफिकचे पूर्व कंट्रोलचे जनरल मॅनजर म्हणून काम करत होते. त्यांचा एकमेव मुलगा हा परदेशात राहतो. मनोज चनसूर्या सोमवारी (13 मे) संध्याकाळी अंधेरी पूर्व मरोळमधून आपल्या मध्यप्रदेशच्या जबलपूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी मुंबईहून निघाले होते. ते टाटा हरिअर लाल कलरची गाडी घेऊन स्वतः चालवत आपल्या पत्नीसोबत जात होते. मनोज घाटकोपरला पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले होते. त्याचवेळी होर्डिंग कोसळले आणि त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा याठिकाणी ढिगाऱ्याखाली मृत्यू झाला.

मनोज चंसोरिया यांचा मुलगा काल अमेरिकामधून वडिलांना फोन करत होता. मात्र वडील फोन न उचलल्याने मुलगा हा भयभीत झाला. मुलाने त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की, माझ्या वडिलांना काय झाले बघा. वडील फोन उचलत नाहीत. मग मुलाच्या मित्रांनी शोध मोहीम सुरू केली. मग मित्रांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर मनोज यांच्या मोबाईलचं लोकेशन तपासणीसाठी पाठवलं. त्यानंतर मनोज यांचे लोकेशन या घाटकोपरच्या पेट्रोल पंप दाखवल्यावर पोलीस या घटनास्थळी दाखल झाले.

मनोज, त्यांची पत्नी अजून देखील ढिगाऱ्याखालीच

पोलिसांनी मनोज यांच्या मुलाच्या मित्रांनाही याबाबत कळवलं. नंतर मनोज यांचे लोकेशन गुगल मॅपवर सर्च करण्यात आलं आणि त्यात बाय वॉक दाखवलं. त्यानंतर पोलिसांना लोकेशन या दुर्घटनामध्ये दाखवल्यानंतर मनोजचा मोबाईल ढिगाऱ्याखालून पोलिसांना मिळाला. मात्र मनोज, त्यांची पत्नी आणि त्यांची गाडी अजून देखील ढिगाऱ्याखालीच आहे. मनोज यांचा मुलगा अमेरिकामधून सातत्याने आईच्या मोबाईलवर फोन करत आहे. मात्र आईचा फोन लागत आहे. तो उचलला जात नाहीय. आई-वडील दोन्हीही फोनवर रिस्पॉन्स देत नसल्याने मुलगा हा भयभीत झालाय. मुलाचे मित्र आणि कुटूंब हे सर्व जण घटनास्थळी दाखल झाले असून मनोज आणि त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.