Ghatkopar West : जनता जनार्दन ‘रामा’ला पावणार की नवीन चेहऱ्यासाठी मतदारांचा ‘कदम’ताल? घाटकोपर पश्चिममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी समीकरणं काय?

Ghatkopar West Vidhansabha Constituency 2024 : विधानसभा निवडणूक हातातोडांशी आलेली असताना अजूनही उमेदवारांवरून आणि मतदारसंघ वाटपावरून घमासान सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अजूनही उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काही मतदारसंघात हॅटट्रिक साधणारे पण उमेदवार आहेत. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात राम कदम यांचा करिष्मा कायम राहणार का?

Ghatkopar West : जनता जनार्दन 'रामा'ला पावणार की नवीन चेहऱ्यासाठी मतदारांचा 'कदम'ताल? घाटकोपर पश्चिममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी समीकरणं काय?
घाटकोपरमध्ये राजकीय वनवास कुणाला?
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 4:18 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अजूनही सुरू झालेली नाही, पण जागा वाटपावरून युती आणि आघाडीत खटके उडल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीत तर आज घमासान झाल्याचे दिसले. तरीही काही मतदारसंघात चित्र वेगळं आहे. या मतदार संघात एकट्या उमेदवाराच्या जीवावर पक्षाला सहज विजय मिळाल्याचे दिसून येते. काही मतदारसंघात उमेदवारांनी हॅटट्रिक आणि डबल हॅटट्रिक केल्याचे दिसून येते. घाटकोपर पश्चिम मतदारसंघात राम कदम यांनी असा करिष्मा साधला आहे. आता चौथ्यांदा त्यांची वाट बिकट दिसत आहे. जनता जर्नादन या रामाला राजकीय वनवासात पाठवतात की पुन्हा एकदा चौकर ठोकतात हे दीड महिन्यात समोर येईल.

लोकसभेत फसले समीकरण

मराठवाड्याप्रमाणेच मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे गणित फसलं. त्यांना मोठी आघाडी घेता आली नाही. मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्य मतदारसंघात त्यांना विजय मिळवता आला नाही. घाटकोपर पश्चिम आणि पूर्वी, मानखूर्द, भांडूप पश्चिम, मुलुंड, विक्रोळी या पट्ट्यात मराठी भाषिक, गुजरात-राजस्थानी मतदार असताना सुद्धा लोकसभेत भाजपला खातं उघडता आलं नाही. ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी भाजपचे मिहीर कोटेचा यांचा पराभव केला. या भागात मराठी मतदारांचा टक्का 45 टक्के आहे. तर गुजराती-राजस्थानी मतदार 13 टक्क्यांचा घरात आहे. मुस्लीम, उत्तर भारतीय यांची टक्केवारी चांगली आहे. राम कदम यांचा घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ याच पट्ट्यात येतो.

हे सुद्धा वाचा

राम कदम यांनी साधली हॅटट्रिक

घाटकोपर पश्चिम मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून येथे राम कदम यांचा बोलबाला राहिला आहे. 2009 साली ते पहिल्यांदा मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर त्यापुढील निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकीटावर लढवल्या. त्यात त्यांनी विजयश्री खेचून आणला. या मतदारसंघात 2.73 लाख मतदार आहेत. त्यात 1.70 लाख म्हणजे जवळपास 75 टक्के मतदार हा मराठी भाषिक आहे. तर उर्वरीत मतदारात गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिमांचा वरचष्मा आहे. राम कदम यांनी त्यांच्या मतदार संघाची चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे त्यांना या मतदार संघात अद्याप धक्का लागलेला नाही. पण 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये मतांची बेगमी कमी झाल्याचे दिसते. त्यांचे मताधिक्य दहा हजारांनी कमी झाल्याचे आकडे बोलतात.

काय आहेत समीकरणं

सध्या महाविकास आघाडीने या मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडीत अनेक जण इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून अमोल मातेले, उद्धव ठाकरे गटाचे इम्रान शेख, संदीप भालेराव यांच्यासह इतर काही जण इच्छुक असल्याचे समजते. तर राम कदम यांना भाजप तिकीट देणार का? याकडे पण काहींचे लक्ष लागले आहे. भाजपमधून इतर काही जण या मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना 55.90 टक्के मतं मिळाली होती. घाटकोपर त्यांच्यासाठी बोनस ठरला होता. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी या मतदारसंघासाठी जोर लावणार हे निश्चित आहे. त्यामुळे राम कदम यांची वाट बिकट आहे हे नक्की.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.