‘ही वादळापूर्वीची शांतता, लवकरच मोठे भूकंप’, गिरीश महाजन यांचं नवं भाकीत

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत गिरीश महाजन.यांनी पुन्हा नवं भाकीत वर्तवलं आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनी याआधी केलेले दावे काही प्रमाणात खरे ठरले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'ही वादळापूर्वीची शांतता, लवकरच मोठे भूकंप', गिरीश महाजन यांचं नवं भाकीत
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 8:13 PM

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 12 मार्च 2024 : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी पक्षांमधून मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाले आहेत. त्यांनी आतादेखील तसं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “मी याआधी देखील सांगितलं होतं. माझ्या संपर्कात काँग्रेसमधील अनेक नेते आहेत. मी यापूर्वीदेखील सांगितलं होतं की, अनेक भूकंप होतील. त्यापैकीच अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला. ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील”, असं मोठं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे.

“शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. शिल्लक सेना आणि शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी, त्यांनी स्वतः कडे बघावं. आणखी काही नेते भाजपमध्ये येतील. जे आज टीका करत आहेत ते उद्या आमच्यात प्रवेश करतील. मी सर्वांची नावे घेत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची रॅली जशीजशी मुंबईत शिवाजी पार्क येथे येईल तसे अनेक धक्के त्यांना बसतील”, असा मोठा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.

गिरीश महाजन यांचं अतुल लोंढेंना प्रत्युत्तर

काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील 12 बडे नेते भाजपात जातील आणि उर्वरित पुन्हा शरद पवार गटात जातील. अजित पवार एकटे पडतील, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांनी आपल्या पक्षात काय सुरु हे बघावं. उगाच काहीही बोलू नये”, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

‘जरांगे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही’

दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “जरांगे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांनी अभ्यासूपणे बोलले पाहिजे. आम्ही एक दिवसाचे अधिवेशन बोलावून आरक्षण दिले आणि तेच आरक्षण टिकणारे आहे. जे शक्य आहे तेच मागायचे. विनाकारण आरोप करायचे हे अजिबात होता कामा नये. एसआयटीची घोषणा झाली. चौकशी सुरू झाली. थोड्या दिवसात सर्व गोष्टी समोर येतील”, असं गिरीश महाजन म्हणाले.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.