मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : मुंबई लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रत्येक प्रवाशाची या लोकल ट्रेनसोबत खूप भावनिक असं नातं आहे. ऊन्हाळा, हिवाळा, पावसाळा, वर्षाचे बाराही महिने ही लोकल ट्रेन सुरु असते. लोकल ट्रेन थांबली तर मुंबई जागेवर थांबते. या लोकल ट्रेनचं महत्त्व शब्दांमध्ये सांगणं खूप कठीण आहे. कारण दररोज ये-जा करणारे प्रवासी या लोकल ट्रेनमध्ये दसरा, दिवाळी साजरा करतात. दसऱ्याच्या वेळी तर लोकल ट्रेनला पताके बांधून गाडीची पूजा केली जाते. पेढे वाटले जातात.
मुंबई लोकल ट्रेनने प्रत्येकाला मित्र दिले, माणुसकी जपायला शिकवली. अर्थात ट्रेनमध्ये भांडणं होतातच, पण ती भांडण संपवण्यासाठी पुढे येणारी माणसं देखील याच लोकल ट्रेनच्या प्रवासात बघायला मिळतात. लोकल ट्रेनमध्ये भजन होतं, गप्पा गोष्टी होतात, माणुसकी जपली जाते. भर गर्दीत स्त्रियांना जागा मोकळी करुन देण्याचा संवेदनशीलपणा येतो. तसेच दगदगीतून नको असणारा संतापही कधीतरी येतो. पण या लोकल ट्रेनमधल्या बऱ्याच गोष्टी व्हायरलही होतात. सध्या लोकल ट्रेनमधला असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
काही दिवसांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये एक तरुण अतिशय सुंदर भजन गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या तरुणाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. त्याचा आवाज तितकाच गोडही होता. याशिवाय संगीतात खूप ताकद असते. एखाद्याच्या कंठात जादू असते, असं आपण म्हणतो. तसाच कंठ या तरुणाचा होता. मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी, भांडणं या व्यतिरिक्त आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. तो व्हिडीओ म्हणजे एक तरुणी अतिशय सुरेख असा बेली डान्स लोकल ट्रेनमध्ये करत आहे.
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तरुणी लोकल ट्रेनमध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान हा व्हिडीओ काढण्यात आलाय. या व्हिडीओत पाहिल्यावर ट्रेनमध्ये गर्दी दिसत नाहीय. याचाच अर्थ हा व्हिडीओ लोकल ट्रेनमध्ये दिवसा दुपारच्या वेळी काढण्यात आलाय.
Entertainment
Now Belly Dancing inside Mumbai Local Train.
It seems #MumbaiLocal Trains are the most happening place..to showcase talent.
Locations seems to be @Central_Railway between Sandhurst Road & Masjid stations.@drmmumbaicr @RailMinIndia @RailMinIndia pic.twitter.com/LI1vFchnHw
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 19, 2023
लोकल ट्रेनमध्ये धिम्या मार्गावर दुपारच्या वेळी फार कमी गर्दी असते. याच गोष्टीचा उपयोग करुन तरुणीने बेली डान्सचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ @mumbaimatterz या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 18 लाख लोकांनी पाहिलं आहे. दरम्यान, आपला जीव वाचवून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. दरवाज्यावर असं काही करणं योग्य आहे का? हा चर्चेचा मुद्दा आहे. पण हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.