Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Strike: आता एकच निर्धार 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यातील जवळपास 59 आगारांमध्ये संप सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारी विभाग म्हणून विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागण्यासाठी संप सुरु केलाय.

ST Strike: आता एकच निर्धार 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 10:33 AM

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राज्यातील जवळपास 59 आगारांमध्ये संप सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारी विभाग म्हणून विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागण्यासाठी संप सुरु केलाय. एसटीच्या संपावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवरुन टीका केलीय. मराठी माणसांच्या मुद्यावर राजकारण करायचे आणि संकटात त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचे, अशी टीका पडळकर यांनी केलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 10 नोव्हेबंर रोजी मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय.

28 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या तरी अबोला सुटेना

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांपैकी मागील काही दिवसात 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन जणांचे प्राण देवच्या कृपने वाचले. 28 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, तरी तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणं तर सोडा. साधे दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरवश्यावर आपले राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे, हाच यांचा मराठी बाणा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

10 नोव्हेंबरला मंत्रालयाबाहेर संसार थाटू

ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावरतीच आणायचे असतील, तर मी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. चला आपला संसार आपल्या पोरा-बाळांसहीत येत्या 10 नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. आपण आपलं 10 तारखेचं आंदोलन लोकशाही मार्गानं लढू आणि जिंकूही. पण, या आंदोलनाला कोणतही गालबोट लागता कामा नये, याची काळजी आपण सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यायची आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

आता एकच निर्धार मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे. आता आत्महत्येचं पाऊल कुणीही उचलू नका, कारण आता लढायचंय आणि लढण्यासाठीचं जगायचंय, जयहिंद,जय महाराष्ट्र, जय मल्हार, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

अंबानी कुटुंबीयांचं लंडनमध्येही ‘अँटिलिया’, 49 बेडरुम्सचा राजप्रासाद, मुंबईतील 500 फ्लॅट्सइतकी किंमत!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, आता मुलगा ऋषिकेशला ईडीचं समन्स, चौकशीचं शुक्लकाष्ठ संपेना!

Gopichand Padalkar appeal to ST Workers if Thackeray Government not solve issue we will protest at Mantralaya

मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.