काकांचं दु:ख सतावतंय म्हणूनच ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा थेट वर्मावर हल्ला

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. (gopichand padalkar attacks mahavikas aghadi over maharashtra bandh)

काकांचं दु:ख सतावतंय म्हणूनच 'महाराष्ट्र बंद'चा देखावा; गोपीचंद पडळकरांचा थेट वर्मावर हल्ला
gopichand padalkar
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:39 PM

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं आहे. मात्र, या बंदवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी खोचक टीका केली आहे. काकांचं दु:ख सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी हा हल्लाबोल केला आहे. मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करायला घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे, कारखाने कवडीमोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचचं पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

जनाब राऊत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला

लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाहीत. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, असे चिमटेही पडळकर यांनी काढले आहेत.

बंद करण्याची गरज काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन या बंदवर भाष्य केलं. निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहिती नाही. त्यांना या प्रकरणाची केवळ अर्धी बाजू माहित आहे. लखीमपूर घटनेत जीप घुसली, त्यामध्ये चार जण चिरडले गेले, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अमानवी आहे. शेतकऱ्यांनी त्याची रिअॅक्शन म्हणून चार जणांना ठेचून मारलं, त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा त्या कारमध्ये असता तर त्यालाही मारलं असतं, मी त्या खोलात जात नाही, कारण तो माझा विषय नाही. या सगळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलाला अटक झाली, आता त्याची चौकशी होईल, मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याची गरज काय होती, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

शिवसेनेच्या भीतीनेच दुकाने बंद

व्यापाऱ्यांनी केवळ शिवसेनेच्या भीतीने दुकानं बंद ठेवली आहेत. आम्हाला काही माहिती नाही, दुकान सुरु ठेवले तर उगाच दगड पडायचा, अशी अनेक व्यापाऱ्यांची भावना असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे हा बंद सपशेल फसला आहे. भाजप या महाराष्ट्र बंदचा निषेध करते. राज्यातील जनतेला हे नाटक कळतंय, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या:

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख, बंद मोडून काढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच; राऊतांचा इशारा

तेव्हा तुमचे खासदार शेपूट घालून का बसले होते, मनसेचा एकाचवेळी ठाकरे-पवारांवर हल्ला, बंदला विरोध!

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(gopichand padalkar attacks mahavikas aghadi over maharashtra bandh)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.