VIDEO: मच्छर आणि थंडीचा मारा सोसत पडळकर, खोत रात्रभर आझाद मैदानात; एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. (Gopichand Padalkar on MSRTC Employees strike)

VIDEO: मच्छर आणि थंडीचा मारा सोसत पडळकर, खोत रात्रभर आझाद मैदानात; एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 10:23 AM

मुंबई: गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही आझाद मैदानात जोरदार आंदोलन केलं. या दोन्ही नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत अख्खी रात्रं आझाद मैदानात घालवली. कडाक्याची थंडी आणि मच्छरांचा त्रास सहन करत या दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानात संपूर्ण रात्रं जागून काढली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही उडी घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी काल जोरदार आंदोलन केलं. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांबरोबर रात्रभर मैदानावरच झोपलेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे, असा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. सरकारमध्ये एसटीचा विलीनीकरणची मागणी घेऊन एसटी कर्मचारी आजाद मैदानात आंदोलन करत आहेत. रात्रभर एसटी कर्मचारी मैदानात जमिनीवरच झोपले होते. एसटी कर्मचाऱ्यांन बरोबरच भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे सुद्धा मैदानावर झोपले होते. आझाद मैदानात महिलांबरोबर पुरुषही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.

सदाभाऊंचं शेतकरी गीत

आज सकाळी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. सदाभाऊ खोत यांनी गावाकडं चल माझ्या दोस्ता… हे गाणं गात संपूर्ण आझाद मैदानात दणाणून सोडलं. सदाभाऊंनी गाणं सुरू करताच एसटी कर्मचाऱ्यांनीही गाणं गायला सुरुवात केली. सर्व कर्मचारी एका सुरात गाणी गात होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह संचारला होता. आम्ही घाबरणार नाही. कर्मचाऱ्यांच्यासोबत राहणार आहे. निलंबित केले म्हणून कर्मचारी घाबरणार नाहीत, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

पुन्हा मंत्रालयावर धडक देऊ

सरकार संपावर तोडगा काढण्याच्या विचारात दिसत नाही. सरकार चर्चेसाठी दारे खुली आहेत असं सांगतं आणि चर्चा करून सुद्धा त्यावर तोडगा काढत नाही. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. जर यावर ठोस निर्णय नाही झाला तर आम्ही इथून मंत्रालयावर पुन्हा एकदा धडक देऊ. इतक्या लोकांची आत्महत्या झाल्या. या लोकांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. तरीसुद्धा सरकार या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहत नाही, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

918 कर्मचारी निलंबित

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुमारे 343 संपकरी कर्मचार्‍यांच्या विरोधात अवमान याचिका एसटी महामंडळाने काल दाखल केली. यावर संबंधितांना येत्या शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. एसटी महामंडळाकडून परवा 376… आज 542 आदी एकूण 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध

Maharashtra MLC Election 2021 : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात कोण ? भाजपची महत्त्वाची बैठक, महाडिक म्हणतात संधी दिल्यास ताकदीने लढू

Garlic For Winters : हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या टाळायच्या असतील तर आहारात लसणाचा समावेश करा!

(Gopichand Padalkar on MSRTC Employees strike)

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.