ठाण्यातील हेलिपॅडवर उतरताच एकनाथ शिंदेंची दीपक केसरकरांबरोबर एकातांत चर्चा, नंतर थेट…
Maharashtra Government Formation: एकनाथ शिंदे दिल्लीवरुन थेट साताऱ्यातील दरेगावात या त्यांच्या गावी गेले. त्यामुळे दोन दिवस राज्यातील राजकीय हालचाली थांबल्या होत्या. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. आता दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे दरेगाववरुन ठाण्यात आले.
Maharashtra Government Formation: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. विधानसभेचे निकाल येऊन आठवडा उलटला आहे. त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री कोण? हे उत्तर मिळाले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे. या सर्व प्रक्रियेत देशातील राजकारणाचे लक्ष हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लागले आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीवरुन थेट साताऱ्यातील दरेगावात या त्यांच्या गावी गेले. त्यामुळे दोन दिवस राज्यातील राजकीय हालचाली थांबल्या होत्या. एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. आता दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे दरेगाववरुन ठाण्यात आले. त्यानंतर हेलिपॅडवरच शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्यासोबत एकातांत चर्चा केली. त्या चर्चेत तिसरा कोणाही सहभागी झाला नव्हता. त्यानंतर माध्यमांशी काही न बोलता थेट ठाण्यातील आपल्या निवासस्थानी एकनाथ शिंदे रवाना झाले.
माध्यमांना उत्तर न देता रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून ठाण्यातील हेलिपॅडवर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पोहचले. दोन दिवसांपूर्वी दरेगावी गेलेले मुख्यमंत्री रविवारी ठाण्यात दाखल झाले. यावेळी रेमंड हेलिपॅड त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना नेते दीपक केसरकर आले होते. स्वागत झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकातांत चर्चा केली. त्या चर्चेनंतर माध्यमांनी एकनाथ शिंदे यांना महायुतीची बैठक होणार आहे का? असा प्रश्न विचारला. परंतु काहीच न बोलता एकनाथ शिंदे थेट निवास्थानी दाखल झाले.
एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांची हेलिपॅडवर चर्चा झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर केसरकर मुंबईच्या दिशेला रवाना झाले.
दिल्लीवरुन थेट दरेगावमध्ये
दिल्लीत महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा होते. या बैठकीनंतर महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार होती. परंतु एकनाथ शिंदे मुंबईला न थांबता थेट साताऱ्यातील आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली होती. शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले होते. परंतु विरोधकांकडून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली.