Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मराठा आरक्षावर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 3:48 PM

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांची उपोषणादरम्यान आज प्रकृती बिघडली. पण ते उपोषणावर ठाम आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल मनोज जरांगे यांची जालन्यात जावून भेट घेतली. पण मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आज चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय घेण्यात आलाय.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज वितरित केला जाणार आहे. सरकारने प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आज 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय

  • मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत (नगरविकास विभाग)
  • मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव (पर्यटन विभाग)
  • राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प (गृह विभाग)
  • आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज (सहकार विभाग)
  • केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट (महसूल विभाग)टमध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात (महसूल विभाग)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकारी निघून गेल्यानंतर सर्व मंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राचा अहवाल पुढच्या आठ दिवसात येणार असल्याचं निश्चित झालंय. तसचे याबाबतची पुढची बैठक आता मराठवाड्यात होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.