मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरु झालाय. ठाकरे सरकारनं विधिमंडळात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 मध्ये ( Maharashtra Public Universities Act 2016 ) सुधारणा करणारं विधेयक मंजूर केलं होतं. या विधेकयकाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. हे विधेयक मंजूर होऊन तीन महिने पूर्ण झालेले आहेत. राज्यपालांनी हे विधेयक बाजूला ठेवत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला आणि अकॅडकमीक परिषधेला संयुक्त बैठक घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. या संयुक्त बैठकीत कुलगुरु शोध समिती स्थापन करण्यासाठी नावांची शिफारस करण्याचं सूचवण्यात आलं आहे.
डिसेंबर 2021 मध्ये राज्य सरकारनं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये सुधारणा केली होती. विद्यापीठ कायद्यातील सुधारणेद्वारे राज्य सरकारनं कुलगुरु निवड प्रक्रिया बदल केला होता. नव्या कायद्यानुसार राज्य सरकारनं शिफारस केलेल्या नावाला राज्यपालांनामंजुरी द्यावी लागेल. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे प्र कुलगुरु असतील. राज्य सरकारनं स्थापन केलेली समिती पाच नावांची शिफारस करेल. राज्य सरकार दोन नावांची शिफारस राज्यपालांकडे करेल, त्यापैकी एका नावाला राज्यपालांना मंजुरी द्यावी लागेल.
सध्याच्या कायद्यानुसार राज्यपाल हे कुलगुरुंची निवड करतात. कुलगुरुंची निवड करण्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्राचार्य, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, संचालक आणि संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित नामांकित संस्थांचे प्रतिनिधी त्या समितीत असतात.
डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यपाल निवडीची प्रक्रिया बदलली. राज्य सरकारनं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल केला. या बदलाला भाजप आणि इतर संघटनांनी राज्यपालांना या कायद्याला मंजुरी देऊ नये, अशा प्रकारची निवेदनं दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा निर्णय बाजूला ठेवत मुंबई विद्यापीठातील कुलगुरु निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
इतर बातम्या:
Girish Bapat on metro : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी द्यावी, गिरीष बापट यांची मागणी
Amravati : राज्यात ऊन-पावासाचा खेळ, पावसामुळे आंबा गळती तर ऊन्हामुळे मोसंबी होरपळली