Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे.

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 7:05 PM

मुंबई : बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ आज रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढेल. पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्यांचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी केले आहे. (Gulab storm expected to hit Gopalpur, Kalingapatnam at midnight today; Chance of heavy rains in Maharashtra)

हिंगोली सलग सहाव्या दिवशी जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात सलग आज सहाव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत होत असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांमध्ये व्यत्यय येत आहे तर उभ्या असलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. कापूस, तूर या पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सोलापूरमधील बोरी नदीला पूर, परिसरातील गावांचा संपर्क तुटला

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, या पावसाने ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे. यामुळे बळीराजाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

बीडमध्ये माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने पुसरा नदीला पूर आला. यामुळे पुसरा, तिगाव, चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यालाही पावसाने झोडपले आहे. (Gulab storm expected to hit Gopalpur, Kalingapatnam at midnight today; Chance of heavy rains in Maharashtra)

इतर बातम्या

रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Release Dates : ‘पृथ्वीराज’ पासून ते ‘हिरोपंती 2’ पर्यंत एकापाठोपाठ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतील ‘हे’ चित्रपट

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.