Gunratna Sadavarte : जरांगे पाटील यांना चावी देऊन कोण चालवतोय? गुणरत्न सदावर्तेंनी थेट घेतलं नाव
Gunratna Sadavarte : "प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल योग्य बोलत आहेत. जरांगे पाटील काय सरकार आहेत का?. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन जाणाऱ्या लोकांना आरक्षण मिळत नसतं" अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
“सुप्रीम कोर्टाने आपल्या कामाची रेषा ओलांडून त्यांनी जातीमध्ये वर्गवारी केली आहे. कायदा बनवण्याचा अधिकार त्यांना नाहीय, पण कायदा लागू करण्याचं काम सुप्रीम कोर्टाच आहे. एससी आणि एसटीच्या आरक्षणात क्रिमिलेयर लागू होत नाही. त्यामुळे हा निकाल चुकीचा आहे” असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. काल 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाने 3:4 असा निकाल दिला आहे. “वर्गवारी करताना कोणते निकष हे लागू होणार आहेत? त्याची काय व्याख्या आहे की नाही?. आम्ही या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करणार आहोत” असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
“कोणत्याही तोडफोडीच मी समर्थन करत नाही. हे तोडफोड करणारे कोण आहेत, हे शोधलं पाहिजे. माझ्या देखील गाडीवर हल्ला करण्यात आला होता, तेव्हा ती लोकं कोण होती? आणि हीच लोक आत्ता आपल्या आरक्षणासाठी लढत आहेत” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल योग्य बोलत आहेत. जरांगे पाटील काय सरकार आहेत का?. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन जाणाऱ्या लोकांना आरक्षण मिळत नसतं, जरांगे पाटील यांना शरद पवार चावी देऊन देऊन चालवत आहेत” असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगाबद्दल काय म्हणाले?
मनसेवर टीका करताना सदावर्ते म्हणाले की, “माझ्यावर काही बोलला तर त्यांना प्रसिद्धी मिळते. राज ठाकरे यांनी मुंबईतून उठून अकोल्यात जो त्यांचा मनसेचा कार्यकर्ता वारला, त्याच्या घरी भेट घ्यायला जावं” “आम्ही एसटी बँकेत सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग देण्यासाठी आम्ही आमच्या एसटी बँकेकडून 500 कोटी रुपये देऊ” अंस गुणरत्न सदावर्ते म्हणाले.