Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?

कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांचे (St Worker Protest) वकील गुणरत्न सादवर्ते यांच्या प्रकरणी दोन्ही बाजुने जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सदावर्ते यांनी एका एसटी कर्मचाऱ्याकडून पाचशे तीस रुपयांप्रमाणे सदावर्तेंनी दीड कोटी रुपये गोळा केल्याचा दावा करण्यात आला होता.

Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?
सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा एसटी कर्मचाऱ्याचा दावाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 5:07 PM

मुंबई : शरद पवारांच्या घाराबाहेरील (Sharad Pawar) आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सादावर्तेंना (Gunratna Sadavarte) दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांचे (St Worker Protest) वकील गुणरत्न सादवर्ते यांच्या प्रकरणी दोन्ही बाजुने जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सदावर्ते यांनी एका एसटी कर्मचाऱ्याकडून पाचशे तीस रुपयांप्रमाणे सदावर्तेंनी दीड कोटी रुपये गोळा केल्याचा दावा करण्यात आला होता. तर पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही तर कोर्टात त्याचा उल्लेख का, असा सवाल सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी केला. तसेच हा हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असून पोलीस का नव्हते? आंदोलकांनाच तिथे धक्काबुक्की झाली. स्कॉटलँड दर्जाचे पोलीस गाफील का राहिले? असे अनेक सवाल सदावर्तेचे वकील कुलकर्णी यांनी केले.

कोर्टात नेमकं काय झालं?

  1. सरकारी वकीलांनी युक्तीवाद करताना, सदावर्ते सतत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. यात चार एसटी कर्मचारी फरार असल्याची माहिती दिली आहे.
  2. तसेच हल्ल्याआधी बैठक झाल्याची पोलिसांची माहिती असल्याचेही सांगण्यात आले. तसेच अभिषेक पाटील या आरोपीची आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात आले.
  3. आजपर्यंत सदावर्तेंनी दीड कोटी गोळा केल्याचा दावा करण्यात आला. तसेच या बाबींच्या तपासासाठी कोठडी महत्वाची असल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलं.
  4. मोहम्मद सादीक शेखही महत्वाचा आरोपी असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितलं. तसेच सावधान शरद…सावधान, अशा आशयाचा बॅनर छापला होता, असेही सांगितले.
  5. तर हा युक्तीवाद खोडून काढताना सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी कोर्टाला सांगितलं की, या आंदोलनात फक्त एसटी कर्मचारी होते.
  6. या आंदोलनाला हल्ला म्हणता येणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा कुणालाही इजा पोहचवण्याच उद्देश नव्हता. यात कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले.
  7. चंद्रकांत सुर्यवंशी या न्यूज चॅनलच्या पत्रकाराचा काय संबंध, असा सवाल केला गेला. त्याचंही नाव कोर्टातल्या युक्तीवादादरम्यान समोर आलं होतं.
  8. हा प्रमुख आरोपी असल्याचा प्रदीप घरत यांनी दावा केला होता. तर सदावर्तेंना त्याने फोन केला एवढेच, बाकी त्यांचा काही संबंध नाही, असा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकीलांकडून करण्यात आला.
  9. या सुर्यवंशीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या आंदोलनावेळी सदावर्ते घटनास्थळी नव्हते. पाचशे तीस रुपयांचा उल्लेख करून तुम्हाला काय शोधायचं होतं, असेही ते म्हणाले.
  10. तसेच नागपुरातून सादवर्तेंना एक फोन आल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. नागपूरमधून कोणत्या व्यक्तीचा फोन आला हे आम्हाला माहिती आहे.त्या व्यक्तीचं नाव उघड सांगू शकत नाही. कोर्टाला त्या व्यक्तीची माहिती दिली आहे, असे सरकारी वकिलांनी सागितलं तर हा हवेतला आरोप असल्याचा कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.

Ashish Shelar: पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले; आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

Phone Tapping : “मी पुन्हा येईन” या नादात माझीच फोन टॅपिंग, खडसेंचा फोन 67 दिवस टॅप केल्याचा आरोप

Jayant Patil: सध्या भाजपकडून मनसेचा वापर सुरू; राज ठाकरे यांच्या सभेआधीच जयंत पाटलांनी डिवचलं

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.