एच. के. पाटील यांनी घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट; गैरसमज दूर होणार का?

आजच्या बैठकीत सत्यजित तांबे यांचा विषय नव्हता. त्यामुळं सत्यजित तांबे यांच्याविषयी आम्ही आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा केली नाही. असंही एच. के. पाटील यांनी स्पष्ट केलं.

एच. के. पाटील यांनी घेतली बाळासाहेब थोरात यांची भेट; गैरसमज दूर होणार का?
नाना पटोले, बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 10:23 PM

मुंबई : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षाकडं पाठविला. त्यानंतर त्या वादावर पडदा पाडण्याचं काम पक्ष नेतृत्व करत आहे. त्या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील राज्यात आले. त्यांनी पटोले आणि थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बाळासाहेब थोरात यांच्या वरळीतील निवासस्थानी एच. के. पाटील (H. K. Patil) यांची बैठक झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले, मी चार दिवसांपूर्वी पक्षनेतृत्वाशी चर्चा केली. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना भेटलो. त्यावेळी मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

वेगवेगळ्या कारणाने पटोले आणि थोरात यांच्यात गैरसमज निर्माण झाले होते. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशीही माझी सविस्तर चर्चा झाली.

थोरात रायपूर येथील बैठकीत उपस्थित राहणार

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करणार आहेत. आता गैरसमज दूर झाले आहेत. काँग्रेस हा एक परिवार आहे. समस्या येत असतात. ही समस्या आम्ही लवकरच सोडवू. बाळासाहेब थोरात रायपूर येथील बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असंही एच. के. पाटील यांनी सांगितलं.

गैरसमज दूर करता येतो

पक्षाच्या अंतर्गत काही समस्या असतात. राजीनाम्याला मान्यता देण्याचा विचार नाही. गैरसमज झाला असेल तर तो सोडविता येतो. हायकमांडलाही ही बाब कळविण्यात आली आहे.

सत्यजित तांबेविषयी बैठकीत चर्चा नाही

आजच्या बैठकीत सत्यजित तांबे यांचा विषय नव्हता. त्यामुळं सत्यजित तांबे यांच्याविषयी आम्ही आजच्या बैठकीत कोणतीही चर्चा केली नाही. असंही एच. के. पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

थोरात हे खर्चे यांचीही भेट घेणार

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्याशी रायपूर येथील पक्षाच्या बैठकीत चर्चा करतील, असंही एच. के. पाटील यांनी सांगितलं. आता या दोन नेत्यांमध्ये समोपचार कसा घडून येतो. हे पाहावं लागेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.