Haath Safe Rakho | लसीकरणाआधीही, नंतरही… हात स्वच्छ धुवा, TV9 नेटवर्क आणि बिस्लेरी हँड प्युरिफायरची मोहीम
टीव्ही9 च्या 11 व्हॅन्स पुढील 11 दिवस देशातील विविध 11 शहरांमध्ये फिरणार आहेत. जनतेला हात स्वच्छ धुण्याचं महत्त्व अधोरेखित करुन सांगणार आहेत. 450 हून अधिक लसीकरण केंद्रांवर टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॅन फिरुन जनजागृती करतील.
मुंबई : कोरोना लसीकरण झाल्यानंतरही निष्काळजी बाळगणं हिताचं ठरणार नाही. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं जितकं गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे सातत्याने हात स्वच्छ धुणं. याचाच एक भाग म्हणून TV9 नेटवर्क आणि बिस्लेरी हँड प्युरिफायर (Bisleri Hand Purifiers) यांच्या साथीने देशभरात हात सेफ रखो (#HaathSafeRakho) ही मोहीम राबवली जात आहे.
टीव्ही9 च्या 11 व्हॅन्स पुढील 11 दिवस देशातील विविध 11 शहरांमध्ये फिरणार आहेत. जनतेला हात स्वच्छ धुण्याचं महत्त्व अधोरेखित करुन सांगणार आहेत. 450 हून अधिक लसीकरण केंद्रांवर टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॅन फिरुन जनजागृती करतील. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या चार शहरांसह देशाच्या विविध भागात टीव्ही9 च्या व्हॅन्स फिरणार आहेत.
भविष्यात कोव्हिडच्या आणखी लाटा थांबवण्यासाठी हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या आधी प्रत्येक नागरिकाने कोरोना सुसंगत वर्तन (Corona Appropriate Behavior) अंगिकारणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञही सांगतात.
कोरोना होऊन गेलेला असो किंवा कधीच झालेला नसो, कोव्हिड लसीकरण होण्यापूर्वी आणि कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.
बिस्लेरी हँड प्युरिफायरचे फायदे काय?
बिस्लेरी हँड प्युरिफायरमुळे तुमचे हात मॉईश्चराईज होतील. याशिवाय तुमच्या हातावरील 99.99 टक्के जंतूंचाही नायनाट होईल. त्याचप्रमाणे याच्या सुगंधामुळे तुम्हाला तजेलाही जाणवेल. त्यामुळे हात स्वच्छ धुवायला विसरु नका, कोरोनाला चार हात लांब ठेवा.
संबंधित बातम्या :
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, तृतीयपंथीयांच्या लसीकरणाला जातीने हजेरी