Rajesh Tope : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : राजेश टोपे

मुलगी म्हणजे खर्च, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अश धारणा आहे. यासाठी समाज प्रबोध करणे गरजेचे आहे. कायदे कडक आहेत, शासन स्तरावर कुठल्याही चुकीच्या केंद्राची गय केले जाणार नाही. अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Rajesh Tope : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : राजेश टोपे
राजेश टोपेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 5:28 PM

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग (Fetal Sex) तपासणी आणि गर्भपाताच्या घटना घडत आहेत. कायदे कितीही कडक केले तरी अवैध गर्भलिंग तपासणीला आळा बसताना दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आरोगमयमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना उपाययोजनांबाबत विचारले. यावर अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे टोपे यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात भाग घेत नाना पटोले म्हणाले की, राज्यात एक हजार मुलांमागे 913 मुली असा आलेख आहे. आणि अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केंद्र आहेत असे सांगितले आहे. पण त्यांच्यावर वॉच ठेवणारी यंत्रणा नाही. डॉक्टरांच्या संगनमताने हे अवैध काम चालते. मुलींची संख्या कमी असणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. (Health Minister Rajesh Tope clarified the role regarding illegal Fetal sex test in Maharashtra)

गर्भलिंग निदान करणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही

राज्यात काही ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याचे उघड झाले असून अशा पद्धतीने गर्भलिंग निदान करणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणारे नाही. अशा अवैध गर्भलिंग निदान रोखण्यावर शासनाच्या स्तरावर काय उपाययोजना आहेत, असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्य पातळीवर स्टेट सुपरवायझरी बोर्ड आहे, एनजीओ आहेत, PCPNDT कायदा यंत्रणा आहेत. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यबल गटाची स्थापना केलेली आहे. जिल्हा सल्लागार समिती आहे, PCPNDT चा कक्ष आहे. दर तीन महिन्याला यांची बैठक झाली पाहिजे असे बंधनकारक आहे, असेही टोपे यांनी नमूद केले.

समाज प्रबोधन करणे गरजेचे

एक हजार मुलामागे एक हजार मुली असायलाच पाहिजे ही भावना आहे पण आपल्याकडील मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मुलगी म्हणजे खर्च, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अश धारणा आहे. यासाठी समाज प्रबोध करणे गरजेचे आहे. कायदे कडक आहेत, शासन स्तरावर कुठल्याही चुकीच्या केंद्राची गय केले जाणार नाही. अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. (Health Minister Rajesh Tope clarified the role regarding illegal Fetal sex test in Maharashtra)

इतर बातम्या

शासकीय सेवेतील भरती TCS, IBPS व MKCLमार्फत होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील ‘सेतू सुविधा केंद्र’ पुन्हा सुरू होणार, कादपत्रांसाठीच्या चकरा वाचणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.