Mumbai Rains Updates: मुंबईत मुसळधार, NDRF ची टीम तैनात, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत पुन्हा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rains Updates: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईमधील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे.

Mumbai Rains Updates: मुंबईत मुसळधार, NDRF ची टीम तैनात, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीत पुन्हा ऑरेंज अलर्ट
गडचिरोलीत धरणाचे सर्व दरवाजे उघडले
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 11:05 AM

Heavy Rain in Mumbai: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी कायम राहिला. सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे मुंबईत तीन एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या आहेत. सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच एनडीआरएफची एक टीम तैनात केली आहे.

एनडीआरएफतर्फे विभिन्न ठिकाणी टीम तैनात

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढलेला आहे. रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईमधील रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे. वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय तीन टीम मुंबईत आणि एक टीम नागपूर येथे नियमित तैनात करण्यात आली आहे. सखल भागात आणि भूस्खलन प्रवण भागात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी एनडीआरएफ सतर्क आहे.

लोणावळ्यात 151 मिलीमीटर पाऊस, गडचिरोलीत धरणाचे दरवाजे उघडले

लोणावळ्यात मागील 24 तासांत 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. आतापर्यंत लोणावळ्यात 2173 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोली मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहे. या धरणाला एकूण 85 दरवाजे असून 85 पूर्णपणे उघडले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पुण्यात सकाळपासून रिमझीम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे वेधशाळेकडून शहरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात आजचा पाणीसाठा

  • खडकवासला  : ७४%
  • वरसगाव : ४४%
  • पानशेत : ५७%
  • टेमघर : ३८%

विमानसेवेवर परिणाम

मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात खराब हवामानामुळे अनेक विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात एअर इंडियाने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुसळधार पावसामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम होत आहे. वाहतुकीचा वेग कमी असल्याने प्रवाशांना लवकर विमानतळावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.