Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई : राज्यातल्या अनेक भागांत आज (शुक्रवार) अचानक पावसाने हजरे लावली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (heavy Rain occur at isolated places in the districts of MUMBAI THANE RAIGAD PALGHAR during next 3 hours)
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात (Maharashtra) अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
राज्यातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता
दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस
महाड, पोलादपुर, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाड, मुरुड, पेण, तळा, सुधागड, कर्जत, खालापुर, पनवेल, उरण सर्वच तालुक्यात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे विटभट्टी व्यवसाईकांचंही नुकसान झालं आहे.
पुण्यातही पावसाची हजेरी
पुण्यातही अनेक भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण असून पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेत बाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
कोकणातही पावसाच्या सरी
मुंबईप्रमाणेच कोकणातल्याही काही भागांत आज सकाळी (शुक्रवार) पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी साडे-पाच सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळाल्या.
उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे . दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय. (heavy Rain occur at isolated places in the districts of MUMBAI THANE RAIGAD PALGHAR during next 3 hours)
संबंधित बातम्या
हिवाळ्यात फिरण्यासाठी तुमच्या जवळचे 11 पिकनिक स्पॉट
Video : Mumbai |अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुंबईत पावसाची हजेरी #Mumbai #MumbaiRain pic.twitter.com/ul6dod50UC
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(heavy Rain occur at isolated places in the districts of MUMBAI THANE RAIGAD PALGHAR during next 3 hours)