Monsoon Prediction: पुढचे तीन दिवस मुंबईसह राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा, तुमचा जिल्हा यात आहे ?
राज्यात तीन दिवस काय असेल पावसाची स्थिती, घ्या जाणून
मुंबई – बुधवारपासून पुढील तीन दिवसही मुंबईसह (Mumbai)कोकणात (Kokan) मुसळधार पावसाचा (heavy rain)इशारा देण्यात आला आहे. कुलाबा हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्यात बुधवारी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा बुधवारसाठी देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांत शनिवारी थोडी उघडीप पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आजही अनेक भागात मोठा पाऊस बरसला आहे.
13 sept, Mumbai Thane , NM rainfall in last 6 hrs at 1.45 pm. Frequent intense spells of rainfall observed and likely to continue for next 2,3 days. Take care and be alert please in this active phase of monsoon. May be Monsoon telling #Mumbaikars; तेरा पीछा नहीं छोड़ूँगा मैं .. pic.twitter.com/EPt7Lbzc17
हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2022
मुंबई, कोकणासह इतरही काही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
13 Sept: पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहील आणि कृपया येथे सूचित केल्यानुसार विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो दररोज IMD अलर्ट पहा, pic.twitter.com/XRMyKcPyc6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 13, 2022
गुरुवारी काय असेल स्थिती
गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अति मुसळधार पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी कसा असेल पाऊस
शुक्रवारी पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
शनिवारी रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यांत सौम्य पावसाच्या सरी पाहायला मिळतील. काही ठिकाणी पावसाची उघडीप असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.