बुडत्याला काठीचा आधार म्हणून काँग्रेसचं कौतुक, प्रवीण दरेकरांचा नेम कुणावर?
प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की, आरोप करण्यापलीकडे ठाकरेंकडे काही नाही.
मुंबई : ठाकरे कुटुंबीयातील मंडळी सुद्धा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बाजूला आहेत. याचं चिंतन करायची गरज आहे. मात्र, टोमणे देण्यातच उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत, अशी टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची भलावण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. बुडत्याला काडीचा आधार म्हणूनच काँग्रेसचं (Congress) कौतुक केलं जातंय, असंही दरेकर म्हणाले.
प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की, आरोप करण्यापलीकडे ठाकरेंकडे काही नाही. टोमणेबाजी आणि मत्सरानं बंद करून पक्ष संघटना कशी टिकवता येईल, यावर जास्त लक्ष द्यायला हवं. पक्षाचं नाव गेलं चिन्ह गेलं ना हिंदुत्व टिकवलं. फेसबुक लाईव्ह करताना तुम्ही पत्रकारांनाही सामोर जात नाही. त्यामुळं एकतर्फीच संवाद साधत असतात.
जनतेच्या दरबारात जात असताना 2019 ला आमच्यासोबत युतीला कौल दिला. जनतेचा कौल तुम्ही मान्य केला का ? काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात जनता होती. तुम्ही त्यांच्याच सोबत सत्तेत बसलात. मोदींच्या जिवावर तुमचे आमदार, खासदार निवडून आले. तर, मग त्यांनाच आता तुम्ही हे बोलता.
तुमचं नाणं गुळगुळीत झालंय ते मान्य करा. लोकसभेची निवडणूक ही मोदींच्या नावानचं झाली. शिंदे काल परवा राजकारणात आलेले नाहीत. 40 आमदार त्यांच्यासोबत 12 खासदार त्यांच्यासोबत आहेत. वापरायला ते दुधखुळे आहेत का ?, असा सवालही दरेकर यांनी ठाकरे यांना केला.
शिवसैनिकांचा तुम्ही वापर केला त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं ? लोकं आता भावनेवर प्रतिसाद देणार नाहीत. रडणारा नाही म्हणतात खर पण लढणारा भावही दिसत नाही.
ठाकरेंनी पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं त्यांनी चिन्हंही दाखवली. जनतेच्या दरबारात जनताच ठरवत असते. म्हणून राज्यात सगळीकडे शिंदे साहेबांचं स्वागत होत आहे. चिन्ह गेल्यानं शिंदे गटाच मोठं नुकसान मेजॅारिटी असूनही त्यांना चिन्हं गमवावं लागलं.
शिवसेना आणि पक्षाच चिन्हं त्यांनाच मिळायला हव होतं. पण त्यांना धक्का आहेच. ठाकरे यांनी वेळकाढूपणा केला. ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र जमा करण्यात आल्याची माहिती आली. गृहमंत्री यामध्ये लक्ष घालतीलचं कारण हा आकडा मोठा असण्याची दाट शक्यता आहे, असं मत दरेकर यांनी व्यक्त केलं.