सावधान! मुंबईकरांनो यंदा धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून कारवाई होणार
पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. | Holi Rangpanchmi 2021

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारकडून होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या सणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत नेहमीप्रमाणे धुळवड साजरी करता येणार नाही. यानंतरही नागरिकांनी ऐकले नाहीच तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. (Holi Rangpanchmi festival in Mumbai rules and regulations)
अर्थात धुळवड घरातल्या घरात खेळता येईल पण चाळ किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.
काय आहेत नियम?
होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तयार क ली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई के ली जाईल.
साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईत आजपासून रात्रीची जमावबंदी
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने शहरात रविवारी मध्यरात्रीपासून 15 एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे. उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, समुद्र किनारे, बगीचे, उद्याने रात्री आठ वाजताच बंद होतील.
संबंधित बातम्या :
Holi 2021 Guidelines : राज्यात होळी, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, तुमच्या शहरातील नियम काय?
Holi 2021 | मुंबईत होळी साजरी करण्यावर बंदी, पालिकेकडून नियमावली जारी
होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
(Holi Rangpanchmi festival in Mumbai rules and regulations)