मुंबई मनपातील कामांचं लेखापरीक्षण होणार, आशिष शेलार यांना गैरव्यवहाराचा संशय
आशिष शेलार म्हणाले, पुलांच्या बांधकाम कामात अवाजवी रक्कम वापरण्यात आली.
मुंबई : भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत दुराचार,भ्रष्टाचार आणि दुरव्यवहार होत असल्याचं वारंवार दिसत होतं. मुख्यमंत्र्यांनी लेखापरीक्षणाचे आदेश निर्गमित केलेले आहेत. 12 हजार 13 कोटी रुपयांची जी कंत्राट दिली गेली त्याची चौकशी होईल. कोरोना काळात सामान्य मुंबईकर जीव कसा वाचेल म्हणत होते. तेव्हा माझा खिसा कसा भरेल याकडे त्यांचं लक्ष होतं. जनतेला आवश्यक आहे म्हणून घेतलेला अजमेरा बिल्डरला 339 कोटी रुपयांचा भूखंड अडीच तीन कोटी रुपयात कसा मिळतो, असा आरोप त्यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले, पुलांच्या बांधकाम कामात अवाजवी रक्कम वापरण्यात आली. 904 कोटी रुग्णालयात खरेदी करण्यात आली. कंत्राटदार बोगस, जवळच्या लोकांना कंत्राट देण्यात आली. या सगळ्यांची आता चौकशी करण्यात येणार आहे. 56 रस्त्यांची दुरुस्ती केली आणि 2 हजार 200 कोटी खर्च करण्यात आले. तरीही मुंबईकरांच्या गाड्या खड्ड्यातच जातात.
पंतप्रधान समान न्याय देतात.धारावीच्या पुनर्विकासाचं स्वप्न बऱ्याचदा दाखवण्यात आलंय. एअर इंडियाची बिल्डिंग बाहेर जाईल, असं चित्र होतं. पण ती महाराष्ट्रात राहणार ते पंतप्रधानांच्या प्रयत्नानेच झालं. समोर दिसलेल्या टीजरवर प्रतिक्रिया देणं परिपक्व राजकारण्यांची पद्धत असते. राज ठाकरे परिपक्व राजकारणी आहेत. मी राज ठाकरेंना याची सविस्तर माहिती देईन, असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.
ते म्हणाले, येत्या महिन्याभरातच कॅगच्या चौकशीचा अहवाल समोर यावा. माजलेल्या बोक्याचं सत्य समोर यायला हवं, अशी आमची मागणी आहे. मुंबई महापालिकेसाठी नवीन राजकीय मतांच गणित ठरवण्यासाठी जागर मुंबईचा हा उपक्रम राबवणार आहोत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा चेहरा उघडकीस आणणार आहोत. अतुल भातखलकर यांच्यावर उपक्रमाची जबाबदारी असणार. मोहम्मद गझनीचे राहिलेले स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात का?, असा सवालही आशिष शेलार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केला.