मोदी 25 मिनिटे बोलले, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिंदे, फडणवीस यांचा किती वेळा उल्लेख?; सर्वाधिक उल्लेख कुणाचा?

यावेळी मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकदाही उल्लेख केला नाही. पवारांचा उल्लेख करणं मोदींनी टाळलं. तर उद्धव ठाकरे यांचा अवघा दोनदाच उल्लेख केला.

मोदी 25 मिनिटे बोलले, उद्धव ठाकरे, शरद पवार, शिंदे, फडणवीस यांचा किती वेळा उल्लेख?; सर्वाधिक उल्लेख कुणाचा?
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 6:53 AM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबईत होते. मुंबईतील विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी मुंबईत आले होते. यावेळी मोठी जाहीरसभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. शिंदे-फडणवीस यांनी आपल्या भाषणातून ठाकरे कुटुंबावरच हल्लाबोल केला. खासकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी सर्वाधिक हल्ला चढवला. त्यामानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण बॅलन्स ठेवलं. विरोधकांवर टीका करताना त्यांनी विकास, देश आणि मुंबई आदी मुद्द्यांनाही हात घातला.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मिनिटे 06 सेकंद भाषण केलं. या भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वच विषयांना हात घातला. आपल्या स्टाईलने त्यांनी विकासावर भाष्य करतानाच विरोधकांवरही टीका केली.

विकास या शब्दाचा उल्लेख सर्वाधिक

मोदींनी आपल्या भाषणात विकास या शब्दाचा सर्वाधिक वेळा उल्लेख केला. आपल्या 25 मिनिटाच्या भाषणात मोदींनी एक दोन नव्हे तर तब्बल 10 वेळा विकास या शब्दाचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी मुंबईचा उल्लेख सर्वाधिक वेळा केला. मोदींनी मुंबईचा उल्लेख 8 वेळा केला.

फडणवीसांपेक्षा शिंदेंचा सर्वाधिक उल्लेख

याच भाषणात मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वाधिक वेळा उल्लेख केला. मोदींनी शिंदे यांचा 6 वेळा उल्लेख केला. तर देवेंद्र फडणवीस यांचा 04 वेळा उल्लेख केला. मोदींनी फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांचा सर्वाधिक उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरेंचा दोनदा तर पवारांचा उल्लेख टाळला

यावेळी मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकदाही उल्लेख केला नाही. पवारांचा उल्लेख करणं मोदींनी टाळलं. तर उद्धव ठाकरे यांचा अवघा दोनदाच उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांचा एकदाच उल्लेख केला.

शरद पवार यांचा उल्लेख टाळला असला तरी उमहाविकास आघाडीचा त्यांनी दोनदा उल्लेख केला. याच भाषणात मोदींनी भ्रष्टाचार आणि मुंबई महापालिकेचा दोनवेळा उल्लेख केला. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा फक्त एकच वेळा उल्लेख केला.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.