‘ठाकरे’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसात किती कमाई?
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला असून, गेल्या दोन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात ‘ठाकरे’ सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्याचे दिसून येते आहे. वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला असून, गेल्या दोन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात ‘ठाकरे’ सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्याचे दिसून येते आहे.
वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’
ठाकरे सिनेमाने 25 तारखेला म्हणजे पहिल्याच दिवशी 6 कोटी रुपयांची कमाई, तर 26 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोन दिवसात 16 कोटींची कमाई ठाकरे सिनेमाने केली आहे.
#Thackeray biz jumps on Day 2… Gets the benefit of #RepublicDay holiday… While #Maharashtra continues to lead, the remaining circuits show an upward trend on Day 2… #Marathi version is excellent… Fri 6 cr, Sat 10 cr. Total: ₹ 16 cr. India biz. #Hindi #Marathi
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2019
शिवसेना स्थापन होण्याचे आधीचे काही वर्षे, शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरचे काही वर्षे असा सुरुवातीचा पट या सिनेमातून मांडला गेला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांनी 60-70 च्या दशकात उठवलेला आवाज, पुढे हिंदुत्त्वाची धरलेली कास, दरम्यानच्या काळातली महत्त्वाची आंदोलने इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत.
ठाकरे सिनेमा आणि वाद-चर्चा वगैरे
- ठाकरे सिनेमावरुन पहिली काहीशी नकारात्मक चर्चा सुरु झाली ती सिनेमात बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेल्या आवाजावरुन. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजावर अनेकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही नापसंती दर्शवली होती.
- संभाजी ब्रिगेड या संघटनेने ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची सिनेमात बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
- ठाकरे सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवरुन सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने मांडला. त्यानंतर ‘उठाव लुंग’ असे बदल या शब्दांमध्ये सिनेमात करण्यात आले.
- ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अर्ध्यातून निघून जाण्यावरुन नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. त्यावरुन 23 आणि 24 जानेवारीला उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, गर्दी असल्याने आपण माघारी गेलो, असे समजुतीचे स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आणि वाद मिटला.