Mumbai Trans Harbour Link | रिअल इस्टेटसाठी शिवडी-न्हावा शेवा पूल ठरणार ‘गेम चेंजर’; समजून घ्या कसं?

Mumbai Trans Harbour Link | शिवडी-न्हावा शेवा ब्रिजकडे फक्त एक सागरी पूल म्हणून पाहता येणार नाही. यामुळे बरच काही बदलणार आहे. गेम चेंजर ठरणारा हा पूल आहे. भविष्यात मुंबई-नवी मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये काय बदल होतील? सर्वसामान्य नागरिकांना यात काय फायदा होईल? समजून घ्या डिटेलमध्ये

Mumbai Trans Harbour Link | रिअल इस्टेटसाठी शिवडी-न्हावा शेवा पूल ठरणार 'गेम चेंजर'; समजून घ्या कसं?
शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलामुळे वर्षाला 1 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याशिवाय CO2 इमिशन म्हणजे कार्बन उत्सर्जन 25 हजार मिलियन टनने कमी होणार आहे. हा एक प्रकारे पर्यावरणाचा फायदाच आहे.
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 12:37 PM

Mumbai Trans Harbour Link | मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक प्रकल्पाची आज सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या ब्रिजच आज लोकार्पण होईल. MTHL सागरी पुलामुळे मुंबई-नवी मुंबई ही शहरच फक्त जोडली जाणार किंवा काही तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार असं नाहीय. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे बरच काही बदलणार आहे. या ब्रिजला अटल सेतू हे नाव देण्यात आलय. MTHL गेम चेंजर ठरणार यात शंका नाहीय. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीच कमी व्हायला मदत होणार नाहीय, तर रिअल इस्टेट मार्केट बदलणार आहे. एखाद्या पडीक जागेत इमारत उभी राहिल्यानंतर त्या जागेला तितका भाव नसतो, पण तिथे पायाभूत सुविधा आल्या की, झटकन जागांचे दर गगनाला भिडतात. MTHL पुलामुळे नवी मुंबईच्या आसपासाच्या भागातील जागांचे दर बदलतील याबद्दल शंका नाही.

या सी लिंकमुळे नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबई-पुणा एक्सप्रेस वे आणि मुंबई-गोवा हायवे काही मिनिटांमध्ये गाठता येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांची संख्या देखील वाढेल. देशातील हा सर्वात मोठा सागरी ब्रिज आहे. मुंबई-नवी मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या सागरी सेतूमुळे 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर येणार आहे. ही एकप्रकारची क्रांतीच आहे. “मुंबई ट्रान्स हार्बर लिंक गेम चेंजर आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल हा इंजिनिअरींगचा चमत्कार आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तनाबरोबरच रिअल इस्टेट मार्केट बदलणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर फक्त 20 मिनिटांवर येईल. पनवेल, उलवे या भागात मोठा विकास होईल. घराची मागणी वाढेल असा अंदाज आहे” असं मंजू यागनिक यांनी सांगितलं. ते नाहर ग्रुपचे व्हाइस चेअरपर्सन आहेत.

म्हणून याकडे फक्त एक ब्रिज म्हणून पाहता नाही येणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे आधीच या भागातील जागांचे दर वाढले होते. आता सी लिंक चालू झाल्यामुळे त्यात आणखी वाढ होईल असं दिसतय. त्याशिवाय मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रोच जाळ विणल जातय याचाही जागांच्या दरांवर परिणाम होईल. भविष्यात नवी मुंबई, पनवेल या क्षेत्रात बांधकाम उद्योगात अधिक गती येईल. त्यामुळे रोजगार वाढतील एकप्रकारे विकासालाच चालना मिळेल. त्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंककडे फक्त एक ब्रिज म्हणूनच पाहता येणार नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.