कशी होणार ऑक्सिजन निर्मिती?; कसा असेल मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट?; वाचा सविस्तर

राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अगदी मुंबई देखील त्याला अपवाद नाही (How will BMC build oxygen plants in Hospitals).

कशी होणार ऑक्सिजन निर्मिती?; कसा असेल मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट?; वाचा सविस्तर
मुंबई महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 4:36 PM

मुंबई : मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अगदी मुंबई देखील त्याला अपवाद नाही. मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढावा यासाठी प्रशासनाने महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प नेमका कसा उभारला जाणार याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (How will BMC build oxygen plants in Hospitals).

ऑक्सिजन प्लांट नेमका कसा तयार होतो?

हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्‍स‍िजन असताना पुन्‍हा तो शोषून नव्‍याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्‍वाभाव‍िक आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्‍णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्‍ये योग्‍य दाबाने हवा संकलित (कॉम्‍प्रेस) केली जाते. त्‍यानंतर ती हवा शुद्ध (फ‍िल्‍टर) करण्‍यात येते. त्‍यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्‍म कण, इतर अयोग्‍य घटक गाळून वेगळे केले जातात (How will BMC build oxygen plants in Hospitals).

या प्रक्र‍ियेनंतर उपलब्‍ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्‍स‍िजन जनरेटर’मध्‍ये संकलित केली जाते. ऑक्‍स‍िजन जनरेटरमध्‍ये असलेल्‍या झि‍ओलीट (Zeolit) या रसायनयुक्‍त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्‍स‍िजन हे दोन्‍ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्‍यात आलेला ऑक्‍स‍िजन अर्थात प्राणवायू हा योग्‍य दाबासह स्‍वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचवला जातो.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प किती दिवसात उभारणार?

प्राणवायू पुरवठ्याची आत्‍यंतिक निकड पाहता, हे 16 प्रकल्‍प उभारण्‍यासाठी महानगरपालिकेने लघू ई-निविदा यांत्रिकी आणि विद्युत खात्यामार्फत प्रसारित केली आहे. निविदा प्रक्र‍िया पूर्ण होवून कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महि‍न्‍यात हे प्रकल्‍प उभारले जातील. या सर्व 16 प्राणवायू प्रकल्‍पातून मिळून प्रतिदिन अंदाजे 33 हजार घनमीटर (सुमारे 43 मेट्रिक टन) इतका प्राणवायू साठा निर्माण करणे शक्‍य होणार आहे.

महानगरपालिकेच्‍या रुग्णालयांची ऑक्सिजनची प्रत्यक्ष निकड, प्रकल्‍प उभारण्‍यासाठी लागणाऱ्या जागेची तसेच तेथील विद्युत पुरवठ्याची उपलब्धता/ क्षमता लक्षात घेवून एक किंवा दोन यंत्रं संबंधित ठिकाणी बसविले जातील. या 16 प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे 90 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.

मुंबईत सध्या दोन रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे 500 घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारला आहे. तर जोगेश्‍वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन 1 हजार 740 घनमीटर (क्‍युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्‍प उभारला आहे. या दोन्‍ही रुग्‍णालयांतील प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प व्यवस्थित कार्यरत असून कोरोना संसर्गाच्‍या काळात ती अत्यंत मोलाची ठरत आहेत. हे दोन्‍ही प्रकल्‍प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत.

नव्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची आयुर्मान 15 वर्षे

विशेष म्‍हणजे प्राणवायू पुरवठादारांकडून जंबो सिलेंडरद्वारे मिळणाऱ्या प्रती लीटर प्राणवायू खर्चाशी तुलना केली तर त्‍याच्‍यापेक्षा अर्ध्‍याहून अधिक कमी दराने या प्रकल्‍पांमधून प्राणवायू निर्मिती होईल. हे प्रकल्‍प किमान 15 वर्षे ते कमाल 30 वर्षे संचालित होवू शकतात. परिणामी महानगरपालिकेच्‍या आर्थिक खर्चात बचत करण्‍यासाठी देखील हे प्रकल्‍प अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहेत.

कोणत्‍याही अडथळ्याविना आणि सातत्‍याने रुग्‍णांसाठी प्राणवायू साठा उपलब्‍ध होणे आवश्‍यक असते. तथाप‍ि, सध्‍या प्राणवायू उपलब्‍ध करुन देताना होणारी कसरत पाहता प्रशासनाने पालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये स्‍वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचे ठरवले आहे. परिणामी प्राणवायू उपलब्‍धतेतील अडथळे कमी होतील, असा अंदाज आहे.

संबंधित बातमी : मुंबईसह नवी मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, पालिकेकडून ऑक्सिजन निर्मिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.