मुंबई- कोरोना निर्बंधाच्या दोन वर्षानंतंर यावेळी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav)उत्साह ओसंडून वाहताना दिसतो आहे. गणरायाच्या आगमनाच्या आधीपासून सुरु असलेली तयारी, गणराय आले त्या दिवशीचा जल्लोष, गेले पाच दिवस घराघरात सुरु असलेली गणरायाची आराधना, माहेरवाशिणी गौरींचं झालेलं कोडकौतुक, या सगळ्यातून हा आनंद घराघरात पाहायला मिळाला. आता घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सवांच्या दर्शनाची गर्दी वाढताना दिसते आहे. मुंबईचं दौवत असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbag Raja)चरणी मस्तक टेकण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच गर्दी होती, मात्र आता ही गर्दी ( increase in crowd)वाढताना दिसते आहे. पुढच्या दोन ते दिवसांत भक्तांच्या गर्दीचा उच्चांक लालबाग राजाच्या चरणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दान टाकीत असतात. दरवर्षी या दानपेटीतील रकमेची मोजणी गणेशोत्सवानंतर केली जात असे. यावर्षी मात्र पहिल्या दोन दिवसांपासून दररोज येणाऱ्या दानाची मोजणी करण्यात येते आहे. पहिल्या पाच दिवसांतच लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचं दान आलेलं आहे. पहिल्या पाच दिवसांत सुमारे अडीच कोटी रुपयांची देणगी दानपेटीत जमा झालेली आहे. केवळ रोखमेका विचार केला तर ही देणगी 2 कोटी 49 लाख 50 हजार रुपये इतकी मोठी आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी या पाच दिवसांत सोने आणि चांदीच्या वस्तूही मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे 250 तोळे सोनं राजाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. 2518.780 ग्रॅम इतकी या सोन्याची मोजणी करण्यात आलेली आहे. तर 29 किलो चांदी राजाच्या चरणी वाहण्यात आलेली आहे. 29164.000 ग्रॅम चांदीची मोजणी करण्यात आलेली आहे. पुढचे काही दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत लालबाग राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या चरणी येणारे दानही आणखी कोटींच्या कोटी उड्डाणे घेण्याची शक्यता आहे.