Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधींचा खर्च, पण पैसे जातात कुठे? काँग्रेसचा सवाल

पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाई केल्याचा दावा करत असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं.

मुंबईत दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधींचा खर्च, पण पैसे जातात कुठे? काँग्रेसचा सवाल
Bhai Jagtap
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 6:00 PM

अंकिता म्हसाळकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाई केल्याचा दावा करत असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरीही पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचतं. मग नालेसफाईसाठी खर्च केलेले पैसे नेमके कुठे जातात, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. (Hundreds of crores are spent on sanitation in Mumbai every year before monsoon, but where does the money go? Congress question)

यावर्षीदेखील मुंबई महानगरपालिका दावा करत आहे की, मुंबईतील नालेसफाई पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी आणि नाले सफाईची सत्य परिस्थिती पाहण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरण सिंग सप्रा आणि मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी धारावी येथील नालेसफाईची पाहणी केली.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आज महानगरपालिका असा दावा करत आहे की, 102 टक्के नालेसफाई झालेली आहे, इथे म्हणजे धारावीत 80-90 टक्के साफसफाई झाली आहे, असा महापालिकेचा दावा आहे. मी मुंबईत काही ठिकाणी नालेसफाईची पाहणी केली, मात्र मला सफाई झालीआहे, असं चित्र पाहायला मिळालेलं नाही. मी आता शिवाजी नगर – मानखुर्द असा नालेसफाईचा दौरा करुन आलो आहे, पण नालेसफाई झालेली नाही. दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु पावसाळ्यात तुंबलेली मुंबई पाहून हा सर्व पैसा कुठे जातो, असा सवाल उपस्थित होतो.

मुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं होतं की, त्यांच्या 84 जागा त्यांनी टिकवून दाखवाव्या. मी पुन्हा एकदा त्यांना आव्हान देईन की त्यांनी त्यांच्या 84 जागा टिकवून दाखवाव्यात.

इतर बातम्या

Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?

केवळ 5 महिन्यांत महापालिकेने बांधला पूल; पूर्व अन् पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग

Photo | मुंबईसाठी शुभसंकेत, शिवाजी पार्कमध्ये गोडया पाण्याचे स्त्रोत सापडले

(Hundreds of crores are spent on sanitation in Mumbai every year before monsoon, but where does the money go? Congress question)

पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.