पत्नीला बहिणीविरोधात लढवणे ही माझी…अजित पवारांच्या विधानाने एकच खळबळ, सुप्रिया सुळेंची पण आली रिॲक्शन

Ajit Pawar on Baramati Lok Sabha Election : अजित पवार यांच्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियात सामना रंगला होता. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत झाली. त्यावर आता अजितदादांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पत्नीला बहिणीविरोधात लढवणे ही माझी...अजित पवारांच्या विधानाने एकच खळबळ, सुप्रिया सुळेंची पण आली रिॲक्शन
अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 4:11 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी एक मोठे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच यावेळी सामना रंगला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया पवार या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार होत्या. तर त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. आता या लढतीबाबत अजितदादांच्या एका वक्तव्याने मोठे वादळ उठले आहे.

ती माझी चूक..

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी एक मोठी कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवणं ही मोठी चूक होती, अशी कबुली अजित दादांनी दिली. बहीण सुप्रियाविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं. आज माझं मन मला सांगतं. तसं व्हायला नको होतं. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहि‍णींकडे जरुर जाणार, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधी खेम्यातून पण प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या वक्तव्यावर मत मांडलं आहे. आपण अजून हे वक्तव्य पाहिलेले नाही. त्याविषयीची अधिकृत माहिती आपल्याकडे नाही, असे त्या म्हणाल्या. तर काँग्रेसमधून पण प्रतिक्रिया आली आहे. अजितदादांना हळूहळू सर्व चुकांची जाणीव होईल, असा टोला त्यांना लगावण्यात आला आहे.

थोरल्या पवारांना सोडून महायुतीत

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत पण मोठं भगदाड पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य पण जगजाहीर झाले. काही दिवसातच शरद पवार यांना सोडून अजित दादा महायुतीत सहभागी झाले. राज्यात दुसऱ्यांदा पक्ष फोडण्याचे नाट्य रंगले. पण लोकसभा निकालात महायुतीवर महाविकास आघाडी वरचढ दिसली.

विधानसभेच्या तोंडावर वक्तव्याला महत्व

विधानसभेच्या तोंडावर अजितदादांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आले आहे. ते महायुतीत नाराज तर नाहीत ना? असा सूर उमटत आहे. जागा वाटपात झुकते माप मिळावे म्हणून हा दबावाचा प्रयत्न तर नाही ना? अशी पण एक चर्चा आहे. पण अजितदादांची यांचा रोखठोक स्वभाव लक्षात घेता या शक्यता नाकारण्यात येत आहे. पण यामुळे दोन कुटुंबातील हळवा कोपरा राज्यसमोर आला हे मात्र नक्की.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.