राज्याच्या मुख्य सचिवपदी अजॉय मेहता, परदेशींकडे मुंबईच्या चाव्या?

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे अजॉय मेहता यांना आचारसंहितेमुळे पदभार स्वीकारण्यात अनेक अडचणी येत होत्या. अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी असलेले अजॉय मेहता राज्यात पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते. पण याहीपेक्षा मुख्यमंत्री […]

राज्याच्या मुख्य सचिवपदी अजॉय मेहता, परदेशींकडे मुंबईच्या चाव्या?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे अजॉय मेहता यांना आचारसंहितेमुळे पदभार स्वीकारण्यात अनेक अडचणी येत होत्या.

अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी असलेले अजॉय मेहता राज्यात पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव होते. पण याहीपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर शिवसेनेचा महापौर बसला असला तरी शिवसेनेला मनासारखी मोकळीक मिळू नये याची चोख काळजी अजॉय मेहता यांनी घेतली. इतकेच नाही तर सत्ता असूनही मेहता यांनी शिवसेनेच्या नाकी नऊ आणले.

अजॉय मेहता यांचे काम पाहता त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लावता यावी, यासाठी खरंतर तीनवेळा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र त्यात आचारसंहिता आडवी येत होती. महाराष्ट्रात जरी लोकसभा निवडणुका संपल्या असतील तरीही देशातील इतर राज्यात अजूनही मतदान बाकी आहे. त्यामुळे मेहतांच्या मार्गात आचारसंहिता हाच मोठा प्रश्न होता. मात्र आज अखेर त्यांचे ट्रान्सफर ऑर्डर येणार आहेत. करण निवडणूक आयोगाकडून मेहतांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान हे स्वेच्छानिवृत्ती घेणार आहेत. खरंतर मदान हे यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होणार होते. पण जर ते या पदावर कायम राहिले असते तर मेहता सचिवपद कसं मिळालं असतं, ही चर्चा आहे.

जेव्हा एक आयुक्त बदलला जातो, तेव्हा त्याची परिणीती म्हणजे इतर आयुक्तांच्या बदल्यात होते आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.