AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS Transfers: राज्यातील IAS अधिकाऱ्यांची खांदेपालट, कुणाची बदली कुठे? वाचा एका क्लिकवर

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आहे. यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता प्रशानात मोठे बदल होत आहे. ए.बी. धुळाज, आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई यांची MD, MAIDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfers: राज्यातील IAS अधिकाऱ्यांची खांदेपालट, कुणाची बदली कुठे? वाचा एका क्लिकवर
मंत्रालय..Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 9:56 PM

मुंबई : राज्यातील आयएएस (IAS Officer) अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आहे. यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता प्रशासनात (Government) मोठे बदल होत आहे. ए.बी. धुळाज, आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई यांची MD, MAIDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या विभागाचा कारभार बदलणार आहे. तसेच नवे अधिकारी आल्याने आता कार्यपद्धतीही बदलण्याची दाट शक्यता आहे. आज बदल्यांबाबत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे (Corona) राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. तो तोटाही भरून काढण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवरही असते. हे अधिकारी प्रशासनात अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे या बदल्यांना विशेष महत्व आहे.

कुणाची बदली कुठे?

  1. श्री ए.बी. धुळाज, IAS (MH:2009) आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई यांची MD< MAIDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. श्री ए.एन.करंजकर, IAS (MH:2009) MD, MAIDC, मुंबई यांची नियुक्ती आयुक्त, रोजगार राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.
  3. श्रीमती बुवनेश्वरी एस., IAS (2015) DG, वनामती, नागपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. श्रीमती वनमथी सी., IAS (2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. श्री आशिष येरेकर, IAS (2018) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि PO, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. श्री मदन नागरगोजे, IAS (MP:2007), सहसचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना MD, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मागच्या वेळी दुसऱ्याच दिवशी बदल्या रद्द

गेल्या वेळी मात्र काहीसा वेगळा प्रकार समोर आल्याने थोडासा गोंधळ उडाला होता. कारण आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्या बदल्या रद्दही झाल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येही काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या बदल्यावर तरी शासन ठाम राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ए.बी. धुळाज, ए.एन.करंजकर, श्रीमती बुवनेश्वरी एस, श्रीमती वनमथी सी, आशिष येरेकर, मदन नागरगोजे यांची आता खांदेपालट झाल्याने यांच्यावर नव्या ठिकाणची जबाबदारी असणार आहे.