सात जणांच्या टोळीची २६ वर्षीय तरुणी मास्टरमाइंड, बँकेला गंडवले ६३ लाखांमध्ये

fraud cases : बँकेचे कर्ज घेऊन पैसे बनावट अकाउंटमध्ये वर्ग करण्याचा प्रकार सात जणांच्या टोळीने केला. या टोळीची मास्टरमाइंड २६ वर्षीय तरुणी निघाली. शिवाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणात सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

सात जणांच्या टोळीची २६ वर्षीय तरुणी मास्टरमाइंड, बँकेला गंडवले ६३ लाखांमध्ये
बनावट पॉलिसीद्वारे बँकेची करोडोची फसवणूकImage Credit source: tv9 network
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 10:59 AM

निनाद करमरकर, अंबरनाथ : नियम कायदे किती तयार केले, किती कागदपत्रे जमा करायला लावले, त्यानंतरही गुन्हेगार मार्ग काढतात. सामान्य जनतेच्या फसवणुकीचे उदाहरणे अनेक आहेत. परंतु बँकांची फसवणूक करणारे विजय माल्या, नीरव मोदीसारखे मोठे व्हॉईट कॉलर गुन्हेगार आहेत. आता अंबरनाथमध्ये बँकेला तब्बल ६३ लाखांमध्ये गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गंडा घालणाऱ्या सात जणांच्या टोळीची मास्टरमाइंड युवती आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केलीये.

काय आहे प्रकरण

नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे इथल्या जयंत बंडोपाध्याय यांचं घर खरेदी रिसेल प्रॉपर्टी म्हणून खरेदी करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांना संपर्क केला. त्यांनी पोटे यांना कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन दिले. त्यांच्याकडून पोटे आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला. तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती, त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट खाते तयार केले.

हे सुद्धा वाचा

अशी केली फसवणूक

बंडोपाध्याय यांचे नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आलं. इकडे आयडीबीआय बँकेनं दिशा पोटे यांची कागदपत्रं तपासून त्यांचं कर्ज मंजूर केलं आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये वर्ग झाली. यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेनं पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे बँकेनं बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी बंडोपाध्याय यांनी आपलं घर विकायचं आहे हे जरी खरं असलं, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून आपलं आयसीआयसीआय बँकेत अकाउंटसुद्धा नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांनी केली चौकशी

या प्रकरणी चक्रावलेल्या आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँकेत धाव घेतली. तिथले रेकॉर्ड तपासले असता तिथे नाव बंडोपाध्याय यांचे नाव होते. मात्र फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आले. त्यामुळे हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आयडीबीआय बँकेनं अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

तिघांना बेड्या

त्यानुसार गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी नवी मुंबईच्या शब्बीर सय्यद मोहम्मद पटेल या बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं. त्याच्या चौकशीतून रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा सुगावा लागताच या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रं बनवून देणारे कुणाल नानजी जोगडीया आणि किशोर प्रवीण जैन या दोघांना अटक करण्यात आली. तर सर्वात शेवटी बंडोपाध्याय म्हणून अकाउंट उघडणाऱ्या राजेंद्र वामन शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्वांच्या ताब्यातून पोलिसांनी अपहार झालेल्या रकमेपैकी जवळपास ४३ लाख रुपयांचं सोनं आणि ९ मोबाईल हस्तगत केले.

आरोपींना कोठडी

सातही आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कर्ज ज्यांच्या नावावर घेण्यात आलं, त्या दिशा पोटे यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय. मात्र त्यांचा खरोखरच या गुन्ह्यात सहभाग आहे का? त्यांना फसवणुकीची माहिती होती का? या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असून त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अटक आरोपींकडून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आणखी २ गुन्हे उघडकीस येत असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी रसिका नाईक या टोळीची मास्टरमाइंड आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.