Eknath Shinde: मी तिथे नसतो तर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर कसा घडला उद्रेक?
आयुष्यात आनंद दिघे यांच्यामुळे कसे राजकारणात आलो, कशी पदे मिळाली हे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रवासात धर्मवीर आनंद दिघे यांनी कसा आधार दिला हे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आणि समाजासाठी काम करायला आनंद दिघे यांनी सांगितलं, असं त्यांनी सांगितलं. राजकारणात आनंद दिघे नेहमी आंदोलनात कसे पाठिशी उभे राहिले हे त्यांनी सांगितले. त्याचवेळी दिघे यांच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं हेही त्यांनी सांगितलं.
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आणि धर्मवीर आनंद दिघे (Dharmveer Aanand Dighe)यांच्या आशीर्वादाने शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले. विश्वासमत ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीरांच्या आठवणी जागवल्या. आयुष्यात आनंद दिघे यांच्यामुळे कसे राजकारणात आलो, कशी पदे मिळाली हे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रवासात धर्मवीर आनंद दिघे यांनी कसा आधार दिला हे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आणि समाजासाठी काम करायला आनंद दिघे यांनी सांगितलं, असं त्यांनी सांगितलं. राजकारणात आनंद दिघे नेहमी आंदोलनात कसे पाठिशी उभे राहिले हे त्यांनी सांगितले. त्याचवेळी दिघे यांच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं हेही त्यांनी सांगितलं.
आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर कसा झाला उद्रेक
एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर काय घडलं ते सभागृहात सांगितलं – धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू झाला. तेव्हा मी कोलमडून गेलो. तेव्हा कळलं ही कोलमडून पडण्याची वेळ नाही. आपला बाप गेला, आपला आधार गेला. तेव्हा हॉस्पिटल बेचिराख करुन टाकलं होतं. पोलीस इन्सपेक्टरला आम्ही सांगितलं की हा लोकांचा उद्रेक झाला आहे. मी तिथे नसतो तर सिलेंडर स्फोटात शंभर एक लोक मेले असते. लोकं बेभान झाले होते, आम्ही हॉस्पिटलमधून पेशंट्सना बाहेर काढलं. जेव्हा धर्मवीरांचं पार्थिव एम्ब्युलन्समधून बाहेर काढलं, तेव्हा ती गर्दी त्याच्या मागोमाग टेंभानाक्याला गेली. त्यावेळी दीडशे जणांवर कारवाई झाली. तेव्हा पोलिसांना सांगितलं हा उद्रेक आहे. जाणूनबुजून केलेली कृती नाही. प्रेमामुळे हे झालेलं आहे. आनंद दिघेंना लोकं दव मानत होती. त्यानंतर माणसं हजर केली, कोर्टाचे जे सोपस्कार होते ते केले. त्यावेळी सगळ्यांना वाटलं की ठाण्यातून शिवसेना संपून जाईल. आदरणीय शिवसेनाप्रमुखांनाही चिंता लागली होती. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना त्या केसमधून बाहेर काढेपर्यंत आपण झोपलो नाही, असे शिंदे म्हणाले. दिघे साहेबांच्या पुण्याईने ठाणे पालघर जिल्ह्यात शिवसेना वाढली.
आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला?
19ऑगस्ट 2001 रोजी अपघात झाल्याने धर्मवीर आनंद दिघे यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. 20 तारखेला त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर 21 ऑगस्ट 2001 रोजी त्यांना संध्याकाळी 7.15ला पहिला हार्ट अटॅक आला. त्यानंतर 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला. आणि रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांचे हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. त्यावेळी आनंद दिघे 50वर्षांचे होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे हे होते. आनंद दिघे यांच्या मृत्यूची बातमी शिवसैनिकांना अनपेक्षित होती. त्यानंतर सिंधानिया हॉस्पिटलबाहेर शिवसैनिकांनी मोठा उद्रेक करत तोडफोड केली होती.