आदित्य ठाकरे यांच्यावर शेंबड मुलदेखील विश्वास करणार नाहीत, रामदास कदम असं का म्हणाले?
एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले नसते तर शिवसेना संपली असती. अजितदादा मुख्यमंत्री झाले असते.
मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. गजानन किर्तीकर शिवेसनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मराठी तरुणांना नोकरी देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. तेव्हा आमच्यात चर्चा झाली. नुकताच गोरेगाव येथे उद्धव साहेबांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला. तेव्हा किर्तीकर यांनी भाषण केलं. त्या भाषणात किर्तीकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. भाजपसोबत गेलं पाहिजे, असं जाहीर भाषण त्यांनी केलं होतं. दसरा मेळाव्यात किर्तीकर यांनी मुलाखत दिली. तेव्हा तात्काळ भाजपसोबत गेलं पाहिजे, असे विचारही त्यांनी मांडले होते, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.
रामदास कदम म्हणाले, माझ्याकडे आले तेव्हा देखील त्यांनी खंत व्यक्त केली की, उद्धव साहेबांजवळ सुभाष देसाई, अनिल परब यासांरखे बडवे आहेत. उद्धवजींवरची नाराजी माझ्याकडे स्पष्ट केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीसोबत जायला नको, अशी नाराजी व्यक्त केली.
गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करतील का, यावर रामदास कदम म्हणाले, त्यावर मी बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना रामदास कदम यांनी सांगितलं की, मी बोलणं उचित नाही. आदित्य ठाकरे यांचा अभ्यास प्रचंड आहे.
अजित दादा यांच्या बॅनरवर रामदास कदम यांनी सांगितलं की, स्वप्न बघायला कुणाची अडचण नाही. शिवसेनेच्या आमदारांना संपवून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले नसते तर शिवसेना संपली असती. अजितदादा मुख्यमंत्री झाले असते.
आदित्य ठाकरेंनी फक्त 40 आमदारांना बदनाम करण्याचं काम करतायत. एककलमी कार्यक्रम हाती घेतलं. आदित्य ठाकरे यांच्यावर शेंबडं मूल देखील विश्वास ठेवणार नाही, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.