Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update : कोरोना रूग्णांची संख्या अशीचं वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा मास्कसक्ती, मंत्रीमंडळातल्या बैठकीत व्यक्त केली चिंता

कोरोनाने (Corona) पुन्हा डोकेवरती काढल्याने दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे. मागच्या आठ दिवसाच्या तुलनेत कोरोनाचा आकडा वाढल्याचे पडसाद आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले.

Corona Update : कोरोना रूग्णांची संख्या अशीचं वाढत राहिली तर मुंबईत पुन्हा मास्कसक्ती, मंत्रीमंडळातल्या बैठकीत व्यक्त केली चिंता
शिवसेनेकडून सामना अग्रलेखाच्या माध्यमातून थेट संकेतImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 2:34 PM

मुंबई – कोरोनाने (Corona) पुन्हा डोकेवरती काढल्याने दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत (Mumbai) देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली आहे. मागच्या आठ दिवसाच्या तुलनेत कोरोनाचा आकडा वाढल्याचे पडसाद आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. कोरोना रूग्णांची आकडेवारी पुन्हा वाढली तर पुन्हा मास्कचा वापर करावा लागेल. याबाबत लवकरचं निर्णय घ्यावा लागेल अशी चर्चा मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितले. आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये देशात 2380 नवे कोरोना रूग्ण सापडल्याचे आहेत. त्याचबरोबर 13,433 कोरोना रूग्ण सध्या उपचार घेत असल्याचे म्हटले आहे.

मंत्रीमंडळातल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पाणीसाठा आणि कोरोनाच्या परिस्थितीचे प्रत्येकवेळी सादरीकरण केले जाते. यावेळी सुध्दा कोरोनाच्या परिस्थितीचे सादरीकरण झाले. मागील आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होती. या आठवड्यात अधिक असल्याचे सादरीकरणात दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रीमंडळातल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

कोरोनाचा आकडा असाचं वाढत राहिला तर पुन्हा मास्कसक्ती

मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिली. कोरोनाचा आकडा असाचं वाढत राहिला तर पुन्हा मास्कसक्ती करण्यात येईल. कोरोनाची रूग्णंसख्या आटोक्यात आली होती. मागच्या आठवड्यात कोरोनाची रूग्णसंख्या २९ पर्यंत गेली होती. काही दिवसांमध्ये पुन्हा शंभरी गाठली आहे. त्यामुळे मुंबईत चिंता वाढली आहे. काल मुंबईत दिवसभरात नऊ हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यामध्ये 98 रूग्ण सापडले, त्यापैकी 96 रूग्णांना कसलीही लक्षणं नाहीत. तपासणी केलेल्या कोणत्याही रूग्णाला रूग्णालयाची किंवा ऑक्सिजन वेडची गरज नाही.

Sandeep Deshpande on Amol MItkari: मिटकरी म्हणजे मटणकरी, चड्डीत राहायचं काय समजलं?; मनसेची मिटकरींना दमबाजी

Brahman Mahasangh Vs NCP : ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीत पुण्यात राडा! अमोल मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी, राष्ट्रवादीचंही प्रत्त्युत्तर

फोर्डनंतर आणखी एका बजेट कार ब्रँडचे भारतातून पॅकअप; उत्पादन केले बंद, कारण काय?

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.