IIT मुंबईच्या प्लेसमेंटमध्ये मोठा रेकॉर्ड, डोळे विस्फारतील इतक्या कोटींच एका विद्यार्थ्याला पॅकेज
IIT मुंबईतील एका विद्यार्थ्याला जे पॅकेज मिळालय, त्या आकड्याने सर्वांना थक्क करुन सोडलय. मुंबईच्या प्लेसमेंट प्रोग्रॅममध्ये एक नवीन रेकॉर्ड सेट झाला आहे. मागच्यावर्षी सुद्धा IIT मुंबईला तिसरं स्थान मिळालं होतं.
मुंबई : देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये IIT मुंबईची गणना होते. सध्या IIT मुंबईमध्ये सुरु असलेला कॅम्पस प्लेसमेंट प्रोग्रॅम चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षी IIT मुंबईच्या प्लेसमेंट प्रोग्रॅममध्ये एक नवीन रेकॉर्ड झाला आहे. तब्बल 3.7 कोटी रुपयांच आतापर्यंतच हायेस्ट प्लेसमेंट पॅकेज मिळाल आहे. या इंस्टीट्यूटमध्ये वर्ष 2022-23 मधील Average प्लेसमेंट बोलायच झाल्यास 1.68 कोटी रुपये आहे. अनेक परदेशी कंपन्यांकडून प्लेसमेंट ऑफर्स आल्या आहेत. टॉप इंजीनियरिंग कॉलेजच्या लिस्टमध्ये IIT मुंबईला यावर्षी तिसर स्थान मिळालय. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये टॉपला असलेलं हे कॉलेज NIRF Ranking मध्ये आघाडीवर आहे.
मागच्यावर्षी सुद्धा IIT मुंबईला तिसरं स्थान मिळालं होतं. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या चालू सीजनमध्ये सरासरी वेतन 21.8 लाख रुपये प्रति वर्ष (सीटीसी) आहे. 2021-22 आणि 2020-21 मध्ये क्रमश: 21.5 लाख रुपये आणि 17.9 लाख रुपये होतं. यावर्षी 1 कोटी रुपयापेक्षा अधिक पॅकेजच्या 16 ऑफर आल्या. एकूण 300 प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये 194 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. यात 65 आंतरराष्ट्रीय ऑफर आहेत. मागच्यावर्षीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय ऑफर कमी आहेत. इंजिनिअरींगनंतर आयटी क्षेत्रात सर्वाधिक भरती
आयआयटी मुंबईमध्ये जुलै 2022 पासून कॅम्पस प्लेसमेंटसाठी 2174 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. आयआयटी कॅम्पस प्लेसमेंटची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा डिसेंबर आणि दुसरा टप्पा जानेवारी ते जून दरम्यान होतो. इंजीनियरिंग आणि टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात सर्वाधिक भरती करण्यात आली आहे. यावेळी 97 कोअर इंजिनिअरींग कंपन्यांनी प्रवेश स्तराच्या पदावर 458 विद्यार्थ्यांची निवड केली. 302 मुलांना 88 पेक्षा अधिक कंपन्यांनी आयटी सॉफ्टवेअर नोकरीचा प्रस्ताव दिलाय. इंजिनिअरींगनंतर आयटी क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली.