इंजेक्शनला घाबरणे सोडा, वेदना न होणाऱ्या सुईचा शोध, IIT मुंबईचा शॉक सिरिंजमुळे उपचार सोपे

IIT Mumbai Shock Siren Injection: शॉक सिरिंजचा विकास केवळ वेदनारहीत इंजेक्शनपर्यंत मर्यादीत असणार नाही. हे एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन शॉट्स देण्यास सक्षम आहे. त्याचा खर्चही कमी असणार आहे. ज्या ठिकाणी वारंवार इंजेक्शन वापरावे लागते त्या ठिकाणी हे संशोधन क्रांतीकारक ठरणार आहे.

इंजेक्शनला घाबरणे सोडा, वेदना न होणाऱ्या सुईचा शोध, IIT मुंबईचा शॉक सिरिंजमुळे उपचार सोपे
shock siren injection
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 6:41 PM

Shock Siren Injection: इंजेक्शनला घाबरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना आता इंजेक्शनच्या सुईमुळे होणाऱ्या वेदना होणार नाही. यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या संशोधनकर्त्यांनी एक वेगळे संशोधन केले आहे. आयआयटीने शॉकवेव आधारित सुई विरहित सिरिंज विकसित केली आहे. त्यामुळे वेदनारहीत सुरक्षित इंजेक्शन लागणार आहे. सईच्या भीतीमुळे डॉक्टरांकडे उपचार न घेणारे किंवा लस न लावणाऱ्यांसाठी हे संशोधन वरदान घेणार आहे. वारंवार इन्सुलिन घ्यावा लागणाऱ्या डायबिटीज रुग्णासाठी हे संशोधन फायद्याचे ठरणार आहे.

आयआयटी बॉम्बच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या टीमने शॉक सिरिंज सुई असणारी सिरिंज बनवली आहे. त्यामध्ये हाय एनर्जी शॉक वेवचा वापर होणार आहे. या वेव ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेगाने त्वचा भेदत शरीरात औषध पोहचवते.

एक्सपर्टचे काय म्हणतात?

शोधार्थी प्रियंका हंकारे यांनी या शॉक सिरिंज इंजेक्शनचे डिझाइन तयार केले आहे. त्या म्हणतात, ही सिरींज औषध वेगाने योग्य ठिकाणी पोहचवते. ती सामान्य सिरिंजच्या तुलनेत त्वचा आणि टिश्यूंना जास्त नुकसान करत नाही. तिचे नोझल 125 मायक्रोन (एक मानवी केसापेक्षा कमी) कमी ठेवले गेले आहे. त्यामुळे वेदना जाणवत नाही.

हे सुद्धा वाचा

भविष्यात काय होणार?

शॉक सिरिंजचा विकास केवळ वेदनारहीत इंजेक्शनपर्यंत मर्यादीत असणार नाही. हे एक हजारापेक्षा जास्त इंजेक्शन शॉट्स देण्यास सक्षम आहे. त्याचा खर्चही कमी असणार आहे. ज्या ठिकाणी वारंवार इंजेक्शन वापरावे लागते त्या ठिकाणी हे संशोधन क्रांतीकारक ठरणार आहे.

शॉक सिरिंजचे फायदे

शॉक सिरिंज सुईने साधारण सिरिंजपेक्षा समान किंवा चांगले परिणाम दिले आहेत. उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे.

  • शॉक सिरिंज त्वचेला कमी नुकसान करून औषध त्वचेत खोलवर पोहोचवते.
  • इन्सुलिन इंजेक्शनमध्ये अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.
  • सुईच्या तुलनेत कमी सूज आणि जलद जखमा बरे झाल्याचे दिसून आले.
  • चिकट औषधे (जसे की अँटीफंगल्स) इंजेक्शनमध्ये सुईपेक्षा ते अधिक प्रभावी होते.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.