IMD Alert : मुंबईकरांना सावधान राहण्याचा हवामान खात्याचा इशारा
मुंबईत आज अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांची चांगलीच तांराबळ उडाली आहे. हवामान खात्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मध्य रेल्वेला देखील फटका बसला आहे. रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु असतानाच आज मुंबईत पाऊसाने धडक दिली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तांराबळ उडाली. मुंबईसह उपनगरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला आहे. वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या उपनगरामध्ये, बदलापू, कल्याण आणि नवी मुंबईतही अवकाळी पाऊस झालाय. पावसासोबत जोरदार वारा वाहत आहे आणि काळे काळे ढग दाटून आले आहेत.
📌Lastest at 5.39pm, thunder clouds now moving towards #Mumbai, #Pune, #Satara. Few intense echoes too.
📌#Mumbai #Thane, #NM sky with mod intensity clouds, but needs to watch 📌Also Parts of #Gujarat, #Rajsthan, west #MP to chked next 2,3 hrs for possibilities of thunderstorms pic.twitter.com/egSdbTGj75
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2024
मुंबईसह पुणे आणि साताऱ्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाचा आढावा घेतला आहे. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात देखील पाऊस होत आहे. मुंबईतील पावसाचा हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यानंतर आता संध्याकाळी खांब कोसळल्याने चाकरमानी घरी निघाले असताना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
डोंबिवली व कल्याण स्टेशनवर प्रवाशांची गर्दी
उल्हासनगर, अंबरनाथ, टिटवाळा परिसरात जाण्यासाठी लोकल ट्रेन येत नसल्याने कल्याण आणि डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे जवळपास तास भर उशिराने धावत आहे.