रात्र वैऱ्याची, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढचे 24 तास अतिमहत्त्वाचे

मुंबईसाठी आजची रात्र जास्त महत्त्वाची आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

रात्र वैऱ्याची, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढचे 24 तास अतिमहत्त्वाचे
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 10:08 PM

मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारासह मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून दिवस-रात्र पाऊस सुरु आहे. असं असताना आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईत दुपारपासून पाऊस पडतोय. हा पाऊस आज रात्रभर कोसळणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने रात्री आठ वाजेपासून उद्या दुपारचे 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांसाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईसाठी पुढचे 12 तास अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. विशेष म्हणजे कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट

हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

हवामान विभागाने मुंबईसाठी आज रात्री आठ वाजेपासून ते उद्या दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत यावर्षी पहिल्यांदाच पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबत त्यांनी मुंबईकरांना गरज असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन केलं आहे.

मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचू शकतं. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊ शकतो. त्याचा नागरिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईकरांसाठी आजची रात्र आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईत सध्या तरी लोकल ट्रेन सुरळीत सुरु आहे. तसेच पावसाचा जोर वाढलेला नाही. रिमझिम पाऊस पडत आहे. पण हवामान विभागाकडून महापालिका प्रशासनाला रेड अलर्टची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आजची रात्र आणि उद्या दुपारपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.