Maharashtra Rain Update | महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, ठाणे जिल्ह्यात धुवाँधार पाऊस कोसळतोय

मुंबई, ठाणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, ठाणे जिल्ह्यात धुवाँधार पाऊस कोसळतोय
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 9:13 PM

मुंबई | 27 जुलै 2023 : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसाचा मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेवरही काहीसा परिणाम पडला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. मुंबईतल अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबई पेक्षा ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती भयानक आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर या शहरांमध्ये पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. या शहरांमध्ये आज दुपारपासून अतिशय मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारवी नदी काठच्या गावातील गावकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. असं असताना आता हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला उद्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरात प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कल्याण डोंबिवली महापालिकेने उद्यासाठी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शहरांतील अनेक भागांमध्ये पाणी साचत आहे. रस्ते जलमय झाले आहेत.

वसई तालुक्यात 12 तासात सर्वाधिक पावसाची नोंद

वसई तालुक्यात आज दिवसभरात सर्वाधिक 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून रिपरिप पडणारा पाऊस दुपारपासून मुसळधार झाला. वसई तालुक्यात आज दिवसभरात 12 तासात सर्वाधिक 104 मिमी पावसाची नोंद झालीय. तसेच नालासोपारा आणि विरारमध्ये देखील मुसलधार पाऊस पडत आहे.

बुलढाण्यात पावसाचं थैमान, पांडव, जटाशकंर नदीला पूर, काही घरं वाहून गेली

सातपुड्याच्या पायथ्याशी जोरदार पाऊस सुरु आहे. पांडव नदी, जटाशकंर नदीला पुर आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावात पाणी घुसले आहे. संग्रामपूर तालुक्यातील शिवाजी नगर येथील काही घरं वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.