बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसणार, राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी

राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची (New Central Motor Vehicle Act) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांना (Driver) अटकाव करण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. राज्यातील वाढते अपघात (Road Accidents) आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation Of Traffic Rules) पाहता परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय.

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर वचक बसणार, राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 11:34 AM

मुंबई : राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची (New Central Motor Vehicle Act) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांना (Driver) अटकाव करण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. राज्यातील वाढते अपघात (Road Accidents) आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation Of Traffic Rules) पाहता परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय.

दंडाची रक्कम वाढली

नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास बाईकस्वारांना एक हजार रुपये, चारचाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. इतकंच नाही तर पुढील तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही पुन्हा गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर विनालायसन्स वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपयेदंड आकारण्यात येणार आहे.

तर धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, चारचाकी चालकाला तीन हजार रुपये तर अन्य वाहन चालकांना चार हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर तीन वर्षात पुन्हा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल.वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, फॅन्सी नंबर प्लेट इत्यादीसाठी एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

नवीन मोटार वाहन कायद्याची गरज काय?

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला. त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेतही मोठी वाढ केली. परंतु राज्यातील जनता त्याला विरोध करत असल्याचं कारण पुढे करत राज्यातील सरकारने त्याला विरोध केला. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्याला स्थगिती देत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सध्या राज्यात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे, वारवार नियमांचे उल्लंघन केले जात आहे. ज्यामुळे राज्यातील अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये काही सुधारणा होते का हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

बाळाचा चेहरा पाहायला निघालेल्या पित्यावर काळाचा घाला, खड्ड्यात बाईक अडकून नाशकात तरुणाचा मृत्यू

Nashik| टेम्पोने उडवल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू; अपघात इतका भीषण की, शरीराचे तुकडे-तुकडे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.