म्हाडा, सिडकोमध्ये घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, उत्पन्नाच्या मर्यादेत बाबत मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा की तोटा?

म्हाडाच्या घरांसाठी नुकतीच लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून ज्यांना लॉटरीत घर लागले आहे अशांना अनामत रक्कम भरण्याची अखेरची तारीख संपली आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ या अर्जदारांना मिळणार की नाही याबाबत लवकरच घोषणेची शक्यता आहे.

म्हाडा, सिडकोमध्ये घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, उत्पन्नाच्या मर्यादेत बाबत मोठा निर्णय, सर्वसामान्यांना फायदा की तोटा?
MHADA AND CIDCO
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 11:15 PM

मुंबई : आपले स्वतःचे घर असावे पण ते परवडणारे असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी म्हाडा, सिडको यासारख्या घरे बांधणाऱ्या प्राधिकरणाकडे इच्छुक अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. लाखो लेक या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करत असतात. मात्र त्यासाठी ठरविण्यात आलेले निकष काही जण पूर्ण करू शकत नाहीत. यातील महत्वाचा निकष म्हणजे उत्पन्नच मर्यादा. या मर्यादेमुळे अनेक जण इच्छा असूनही घरांसाठी अर्ज करू शकत नाहीत. मात्र, केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाच्या निकषात वाढ करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला केली होती.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने 21 जून 2023 रोजी एक पत्र केंद्र सरकारला पाठविले होते. या पत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाच्या निकषात 3 लाखांऐवजी 6 लाख रुपये वाढ करावी अशी विनंती करण्यात आली होती.

त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क करुन त्यांना यासंदर्भात विनंती केली. यासंदर्भात केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने आदेश काढला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणार्‍या एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणार्‍या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता 3 लाख रुपयांवरुन 6 लाख रुपये करण्यात आला आहे. याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आभार मानले आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.