महाराष्ट्रात ओमिक्रॉनची धडक, लोक बेफिकीर, अजित पवार म्हणतात, काही राजकीय लोकांच्या घरी लग्न झाली

लहान मुलांना डोस कधी देणार? त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, ही गोष्ट खरी आहे. (Corona vaccination for Children) आता जे पेशंट सापडलेत, त्यात त्यांच्या घरातल्या लहान मुलांनाही कोरोना झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच मी पहिल्यांदाच सांगितलं, याबाबत आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना यांनी भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनची धडक, लोक बेफिकीर, अजित पवार म्हणतात, काही राजकीय लोकांच्या घरी लग्न झाली
ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 9:41 AM

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूनं धडक दिलीय. मुंबई, पुणे, पिंपरीत मिळून 21 रुग्ण सापडलेत. अजून काहींच्या टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळेच रुग्णांचा आकडा वाढू शकतो. त्यामुळेच प्रशासन काय करतंय, राज्य सरकार काय करतंय, केंद्र सरकार काय सुचना देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pwar At ChaityaBhumi) आज मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांना या सर्व बाबींवर पत्रकारांनी सवाल केले.

ओमिक्रॉनच्या स्फोटावर काय तयारी आहे? पत्रकारांच्या या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘याबद्दल मुख्यमंत्र्यांचं, प्रशासनाचं, मंत्रिमंडळातील इतरांचं बारकाईनं लक्ष आहे. बाहेरच्या राज्यातून, परदेशातून हे जे पेशंट येतात, त्याबद्दल केंद्र सरकारनेही कडक भूमिका घ्यायला पाहिजे. जिथं जिथं आंतरराष्ट्रीय विमानं येतात तिथं काटेकोरपणे नियमांचं पालन होतंय की नाही ते बघितलं पाहिजे. कारण मागे आपण बघितलं, दोन वर्षापुर्वी मार्च महिन्यात एक कप्पल दुबईहून आलं, त्याची लागण एका ड्रायव्हरला झाली आणि तिथून कोरोना फोफावला. आताही इतर राज्यात एखाद दुसऱ्याला झालेलं पहायला मिळत होतं पण आधी कुटुंबाला आणि नंतर इतरांनाही त्याची लागण झाली. ह्या विषाणूनं कव्हर केलं. सगळे जण सांगतात, मास्क वापरा, काही जण म्हणतात त्याची (ओमिक्रॉनची) तीव्रता कमी आहे. पण एकदा देशपातळीवरच WHO नेच त्याबाबत क्लिअर केलं पाहिजे. जी माहिती आहे, त्यानुसार ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांनाही बाधा झालीय. मग बुस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. याबाबतही देशपातळीवर तातडीनं निर्णय होण्याची नितांत गरज आहे’.

लोकांमध्ये बेफिकिरी ओमिक्रॉनचा स्फोट (Maharashtra Omicron Blast) झाल्यानंतरही लोक बेफिकिर असल्याचा सवा पत्रकारांनी केला. त्यावेळेस अजित पवारांनी नेत्यांच्या लग्नातल्या गर्दीवरही बोट ठेवलं. ते म्हणाले, ‘तुम्ही बघितलं, काही राजकीय लोकांच्या घरातली लग्नं झाली. प्रचंड गर्दी. लोक अजिबातच त्या गोष्टीला (कोरोना प्रतिबंध पाळण्याला) महत्व देत नाहीत. हा विषाणू (ओमिक्रॉन) गतीनं पसरतो. काही जण सांगतात की, तुम्ही चहा पिण्यासाठी जरी मास्क काढला तरीसुद्धा तो पसरतो अशी दबक्या आवाजत चर्चा आहे. याबाबत डॉक्टर, एक्सपर्ट हे वेगवेगळं सांगतात, एकदा देशपातळीवर त्याबद्दल चित्रं क्लिअर झालं की मग ती ती राज्य जे काही करायचं आहे ते पुरवण्यासाठी कमी पडणार नाहीत. त्यात महाराष्ट्रही मागे रहाणार नाही’.

बुस्टर डोस देण्याबाबत चर्चा आहे का? बुस्टर डोस (Maharashtra Booster Dose) देण्याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. एकदा ते देशपातळीवर क्लिअर व्हावं. बुस्टर डोस द्यायचा तर का द्यायचा आणि नाही तर का नाही हे तज्ञ लोकच सांगू शकतात’.

लहान मुलांना डोस लहान मुलांना डोस कधी देणार? त्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, ही गोष्ट खरी आहे. (Corona vaccination for Children) आता जे पेशंट सापडलेत, त्यात त्यांच्या घरातल्या लहान मुलांनाही कोरोना झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच मी पहिल्यांदाच सांगितलं, याबाबत आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना यांनी भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे.

हे सुद्धा वाचा:

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

Numerology Today 6, December 2021 | आता अंकशास्त्रानुसार तुमचे करिअर ठरवा, पाहा तुमचा शुभ अंक काय सांगतोय ?

Yoga Poses : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘ही’ 4 योगासने नियमित करा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.