Mumbai milk price : मुंबईत गोकुळ दूध संघाची दरात वाढ, उद्यापासून दुधासाठी प्रतिलीटर दोन रुपये जादा मोजावे लागणार
मुंबईत दूध दरात वाढ करण्यात आलीय. गोकुळ दूध संघाने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून प्रतिलीटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय.
मुंबई : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. दुधाच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनावरांच्या खाद्यात वाढ झाली. खाद्याचा खर्च हा जास्त झाला. त्यामुळं ही दरवाढ करणे आवश्यक आहे. कारण दुधासाठी पशूंना चांगले खाद्य द्यावे लागते. खाद्याच्या दरात वाढ झाल्यास उत्पादन खर्च (cost of production) वाढतो. अशावेळी दूध उत्पादकांना भाववाढ मिळणे आवश्यक असते. पशूखाद्य तसेच जनावरे सांभाळण्याचा खर्च वाढला. या पार्श्वभूमीवर दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एक-दोन रुपये दुधाच्या दरात वाढ करून दूध उत्पादकांना (producers) खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर, तर गाईच्या दुधाच्या दरात एक रुपये प्रतिलीटर वाढ करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने (Gokul milk union) घेतला आहे. याचा फायदा दूध उत्पादक व संघालाही होणार आहे. सर्वसामान्यांचे खिसे मात्र खाली होणार आहेत.
म्हशीच्या दुधासाठी मोजावे लागणार 66 रुपये
मुंबईत दूध दरात वाढ करण्यात आलीय. गोकुळ दूध संघाने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. रविवारपासून प्रतिलीटर दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय. आता उद्यापासून मुंबईत म्हशीच्या एक लीटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. आधी म्हशीचे दूध प्रतिलीटर 64 रुपये होता. या वाढीव दराचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
गाईच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ
गोकुळने दूध खरेदी दरातही वाढ केली. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील. गाईच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर एक रुपये वाढ करण्यात आली. म्हशीच्या दरात दोन रुपये प्रतिलीटर वाढ करण्यात आली. याचा फायदा दूध उत्पादक शेतकरी तसेच गोकुळ दूध संघालाही होणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून प्रतीलीटर एक ते दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. गोकुळने दरवाढ केली असली तर इतर दूध संघांनी ही दरवाढ केलेले नाही. त्यामुळं इतर दूध संघाचे दुधाचे दर तेच राहतील. फक्त गोकुळ दूध संघानं ही दरवाढ केली आहे. त्यामुळं फक्त गोकुळच्या दूध दरात वाढ झाली आहे.