मनुस्मृती वगैरे असेल तर… माझ्यावर कारवाई झाली तरी पर्वा नाही…; छगन भुजबळ कडाडले
छगन भुजबळ यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मनुस्मृतीवर बोलताना ते म्हणाले की, माझ्यावर काहीही कारवाई झाली तरी कुठली तरी मला त्याची पर्वा नाही. का म्हणाले असे भुजबळ जाणून घ्या.
छगन भुजबळ यांनी टीव्ही ९ मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी मी लोकसभेला माघार घेतली. तेव्हाच माझ्या पक्षाकडून घोषणा होईल असं वाटलं. कार्यकर्त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. भुजबळांना राज्यसभेवर पाठवू असं सांगायला हवं होतं. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांची जागा खाली होती. जेव्हा सहा वर्षापूर्वी पटेलांना राज्यसभेवर पाठवलं तेव्हाच मी इच्छुक होतो. वेळ आल्यावर बोलू असं वाटलं होतं. पण पटेल म्हणाले माझ्यावर डिस्क्वॉलिफिकेशनची केस आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी मला राज्यसभेवर जावं लागेल असं पटेल म्हणाले. त्यानंतर आता लोकसभेवर जायची इच्छा होती.
राज्यसभेवर जाण्याची इच्छा – भुजबळ
‘आता वेळ आली होती. आता पुन्हा सांगितलं राज्यसभेवर जायचं. त्याची कारणं सांगितली. विधानसभेत ४० वर्ष झाली आहे. मंत्रीपदे मिळाली. वय झालं. कधी मी संसदेत जाणार. ज्यांना मी शाखाप्रमुख केलं. ते संसदेत निवडून गेले आणि मंत्रीही झाले. मलाही वाटलं. माझ्यासोबत काम करत असलेले मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झाले. मलाही वाटलं आपणही गेलं पाहिजे. अनेक मित्र म्हणत होते किती दिवस विधानसभेत. म्हणून इच्छा प्रकट केली. परवा मिटिंग झाली. तेव्हा चर्चा झाली. अजितदादा त्यावेळी बाहेर गेले. निवडणुकीच्या आदल्या दिवशी चर्चा केली. त्यानंतर एक एकाने सुनेत्रा ताईंचं नाव पुढे आणलं. सर्व म्हणाले, आता हे करावं लागेल. ह्युमिलेशन झालं नाही. फक्त इच्छा होती.’
‘प्रफुल्ल पटेल यांची निवडणूक झाली. त्यावेळीही अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता दुसरं नाव आलं. एवढ्या वर्षाच्या राजकारणात वाटतं ही संधी मिळेल. पण संधी हातून जाते. मुख्यमंत्री होऊ असं वाटतं आणि संधी निघून जाते. प्रत्येकवेळी आपले निर्णय चुकतात. आणखी काही घटना घडत असतात. पण आपण सीनिअर आहोत, योग्य आहेत पदाला तरी जाऊ शकत नाही. कुणावर नाराज नाही.’
‘जेव्हा जेव्हा समता परिषदेच्या रॅली झाल्या. प्रत्येक रॅलीच्या सुरुवातीला मनुस्मृती जाळली. जेव्हा शालेय शिक्षणात श्लोक येणार हे चाललं होतं. तेव्हा मी म्हटलं हे आम्हाला मान्य होणार नाही. ते होता कामा नये. विरोधी पक्षात असल्याने आव्हाड उठवणार. त्यांना मनुस्मृतीचं दहन करायचं आहे. त्या भावनेने गेले होते. भावना चांगली होती. त्यांना बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचा कार्यक्रम नव्हता. अनावधानाने हे झालं. त्यानंतर ताबडतोब जितेंद्र आव्हाड यांनी मनापासून माफी मागितली. मनुस्मृती शिक्षणात फोकस नको हा डायव्हर्ट झाला. पण फोकस आव्हाडांवर गेला. पण मी म्हटलं मनुस्मृतीचं काय? तुम्हाला बाबासाहेबांचा एवढा जिव्हाळा आहे. तर तुम्ही आधी मनुस्मृतीचा धिक्कार करायचा होता. मग आव्हाडांचं काय करायचं ते केलं असतं.’
फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर चालणारा – भुजबळ
‘एक पाहा मी फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर चालणारा आहे. मनुस्मृती अशा काही गोष्टी असतील तर त्या पलिकडे जाऊन मी त्या गोष्टीकडे पाहत असतो. नाही म्हणजे नाही. माझ्यावर काहीही कारवाई झाली तरी कुठली तरी मला त्याची पर्वा नाही.. मनुस्मृतीच्या बाबतीत इतर कोणत्याही गोष्टीची मी तमा बाळगणार नाही.’ असं ही छगन भुजबळ म्हणाले.