‘ते’ बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.
नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच विरोधकांनी सरकारला कोणत्या मुद्यावरून घेरायचं हा निश्चिय केला होता. त्यामुळेच पहिल्या दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांची बेताल वक्तव्य, सीमावाद यावरून जोरदार टीका करण्यात येत होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावादावरून टीका करताना एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गद्दारांचे सरकार आहे. ज्या लोकांनी बंडखोरी करून सरकार स्थापन केले आहे. त्या लोकांचे हे सरकार घटनाबाह्य सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.
त्यानंतरही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याविषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, देशात प्रथमच एका राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली.
सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आदित्य ठाकरे यांनी ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पद यांनी हे मिळवले असले तरी ते घटनाबाह्य पद त्यांनी बळकावले असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबच हे सरकार राज्यासाठी काम करत नसून हे मुख्यमंत्री त्यांच्या 40 गद्दांरासाठी काम करत आहे असल्याची टीका त्यांनी केली आहे.